
अशी असेल मावळातील गण व गटांची प्रारूप रचना
वडगाव मावळ:
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा अनेक पंचायत समितीच्या बारा गणांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली.
तालुक्यातील जिल्हा परिषदेचे नव्याने झालेले गट व पंचायत समिती गण व त्यातील समाविष्ट गावे व वाड्या-वस्त्या
टाकवे बुद्रुक – नाणे गट
●टाकवे बुद्रुक गणात पुढील गावे – सावळा, माळेगाव बु, माळेगाव खुर्द, पिंपरी आ मा, इंगळुण, कुणे-अनसुटे, कश्याळ, किवळे, भोयरे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आंबळे, शिरे, मंगरूळ, टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज, कोंडीवडे आ. मा.
●नाणे गणात पुढील गावे – खांड, कुसुर, साई, पारवडी, नानोली नामा, घोणशेत, वाऊंड, कचरेवाडी, डाहुली, वाहनगाव, कांब्रे आमा, बोरिवली, कुसवली, नागाथली, वडेश्वर, माऊ, करंजगाव, ब्राम्हणवाडी, पाले नामा, मोरमारवाडी, उकसान, शिरदे, सोमवडी, थोरण, राकसवाडी, जांभवली, गोवित्री, भाजगाव, वळवंती, वडवली, कांब्रे नामा, कोंडीवडे नामा, नाणे.
खडकाळा- वराळे गट*
●खडकाळा गणात पुढील गावे – खडकाळा, – खामशेत, कुसगाव खुर्द, चिखलसे, अहिरवडे, साते, ब्राम्हणवाडी, मोहिते वाडी.
●वराळे गणात पुढील गावे – नानोली तर्फे चाकण, आंबी, राजपुरी, आकुर्डी, वराळे, जांभुळ, सांगवी, कान्हे नायगाव.
कुरवंडे – कार्ला गट
●कुरवंडे गणात पुढील गावे – कुरवंडे, उधेवडी, कुणे नामा, वरसोली, पांगळोली, वाकसाई, देवघर, करंडोली, वेहेरगाव, दहीवली, शिलाटणे, टाकवे खुर्द, सांगिसे, वेल्हवळी, बुधवडी, खांडशी, नेसावे.
●कार्ला गणात पुढील गावे – डोंगरगाव, औंढे खुर्द, औंढोली, देवले, मळवली, सदापुर, पाटण, बोरज, भाजे, कार्ला, ताजे, पिंपळोली, पाथरगाव, मुंढावरे, वडीवळे, वळख.
कुसगाव बुद्रुक – सोमाटणे गट
●कुसगाव बुद्रुक गणात पुढील गावे – कुसगाव बुद्रुक, गेव्हंडे आपटी, दुधीवरे, अतवण, लोहगड, महागाव, ढालेवाडी, माळेवाडी, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, आंबेगाव, माजगाव, शिंदगाव, पाणसोली, पाले पमा.
●सोमाटणे गणात पुढील गावे – कडधे, करूंज, बेडसे, बौर, ब्राम्हणवाडी, शिवणे, सडवली, ओझर्डे, उर्से, आढे, परंदवडी, सोमाटणे.
चांदखेड – काले गट
●चांदखेड गणात पुढील गावे – डोणे, आढले बुद्रुक, आढले खुर्द, ओव्हळे, दिवड, पुसाणे, पाचाणे, चांदखेड, कुसगाव पमा, बेबड ओहळ, पिंपळ खुटे.
●काले गणात पुढील गावे – थुगाव, आर्डव, कोथुर्णे, मळवंडी ठुले, यलघोल, धनगव्हाण, मळवंडी पमा, काले, येळसे, केव्हरे, चावसर, तुंग, मोरवे, शेवती, कोळे चाफेसर, शिळिंब, वाघेश्वर, कादव, अजीवली, जवन, ठाकुरसाई, गेव्हंडे खडक, तिकोणा, वारू, ब्राम्हणोली, शिवली, भडवली.
इंदोरी – तळेगाव दाभाडे ग्रामीण गट
●इंदोरी गणात पुढील गावे – सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, – जांबवडे, नवलाख उंब्रे, जाधववाडी, बधलवाडी, मिंडेवाडी.
●तळेगाव दाभाडे ग्रामीण गणात पुढील गावे* – माळवाडी, गहूंजे, शिरगाव, गोडुंब्रे, धामणे, साळुंब्रे, दारुंब्रे, सांगावडे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे





