पवनानगर:
कोथुर्णे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत श्री.भैरवनाथ परिवर्तन शेतकरी पॅनलने घवघवीत यश मिळवले.श्री.स्वामी समर्थ शेतकरी पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनलने जोरदार मुसंडी मारीत सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ पॅनलने  आठ  जागा मिळवल्या.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
ज्ञानेश्वर तातेराम निंबळे, बाळासाहेब गोविंद दळवी,वाघू श्रीपती दळवी,बाळासाहेब नागू मसूरकर, यशवंत कृष्णा बोडके,गणपत गोपाळ काळे,लक्ष्मण बारकू काळे,ज्ञानेश्वर रामचंद्र निंबळे, संभाजी दत्तू काळे , अंकुश ज्ञानदेव सोनवणे ,  सिताबाई अमृता मोहोळ,शितल शिवाजी ढोले विजयी झाले.

error: Content is protected !!