श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भगवान शंकराचे मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळ तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या सह्याद्री च्या कुशीतील जांबवली या गावांत असणारे स्वयंभू पिंड, महादेवाचे मंदिर दक्षिण बाजूजवळ प्रांगणामध्ये भगवान श्री शंकराचे मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना मावळचे मा. आमदार दिगंबरदादा भेगडे व श्री पोटोबा देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे शुभहस्ते आणि पोलीस पाटील दत्तात्रय लालगुडे यांचे अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी मा आमदार दिगंबर भेगडे यांनी शुभेच्छा व्यक्त करत असताना स्थानिक ग्रामस्थiणी केलेल्या सहकार्यामुळे आणि कागदपत्रांच्या पाठपुराव्या हे देवस्थान तीर्थशेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आणि खऱ्या अर्थाने येथील विकास झाला असे प्रतिपादन केले.
श्री पोटोबा देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व पोलीस पाटील दत्तात्रय लालगुडे यांनी सदर काम होणेसाठी विशेष प्रयत्न केले असल्याने, तेथील ग्रामस्थ मा. सरपंच भगवान पवार व हरिभाऊ कदम आणि राजू कदम यांनी ग्रामस्थांचे वतीने त्यांचे आभार मानले.
यावेळी संत तुकाराम साखर कारखान्याचे मा संचालक माऊली शिंदे, मावळ भाजपा चे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ह भ प सुखदेव महाराज ठाकर,तालुका अध्यक्ष दत्तात्रय महाराज शिंदे, मा जि प सदस्य गुलाबराव वरघडे,चंद्रशेखर भोसले,मा. पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव बालगुडे गणपतराव सावंत या स्तुत्य कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या
या प्रसंगी श्री पोटोबा देवस्थान विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त, सुभाषराव जाधव, किरण भिलारे, तुकाराम ढोरे, नारायण ढोरे,पंढरीनाथ भिलारे,अरविंद पिंगळे,बाळासाहेब कुडे,मा ग्रा सदस्य भरतशेठ म्हाळसकर, उद्योजक राजुशेठ लालगुडे, रविंद्र हुंडारे,,नगरसेवक किरण म्हाळसकर,मा सरपंच प्रकाश आगळमे,रविंद्र म्हाळसकर, रमेश ढोरे,वडगाव सोसायटी चे व्हाईस चेअरमन निलेश म्हाळसकर,संचालक ऍड अजित वहिले,सोमनाथ काळे, गणेश गवारे,संभाजी येवले आदीसह, पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडगाव भाजपचे सरचिटणीस कल्पेश भोंडवे तर आभार अखिल भारतीय वारकरी मंडळ चे वडगाव गटाचे अध्यक्ष नारायण ढोरे यांनी मानले
सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री पोटोबा देवस्थान, श्री कोंडेश्वर देवस्थान,श्री सत्संग भजनी मंडळ आणि अखिल भारतीय मंडळाचे सर्व प्रमुखांनी केले होते.

error: Content is protected !!