चारसूत्री भात लागवड फायदेशीर
पवनानगर :
चारसूत्री भात लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदकुमार धनवे यांनी केले.मावळ तालुका कृषी विभागाकडून खरीप हंगाम तयारी सुरू असून कढधे येथे चारसूत्री भात लागवड प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी धनवे बोलत होते.
तालुका कृषी अधिकारी मावळ व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व तयारी चारसूत्री भात लागवड प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कडधे येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांना भात चारसूत्री लागवडीबाबत प्रादेशिक संशोधन केंद्र वडगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कदम यांनी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे यांनी कृषी विभागाकडून केले जाणारे खरीप हंगाम नियोजन याबाबत माहिती दिली.
पवन मावळात भातासाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी भातासाठी आवश्यक सेंद्रिय कार्बन नियंत्रणसाठी हिरवळीची खते, सेंद्रिय खते, पिकाचे अवशेष हे जमिनीत मशागत करताना गाडावेत. पेरणी पूर्वी भात बिजप्रक्रिया, गादी वाफ्यावर रोपवाटिका व गादी वाफ्यावर पेरणी केली की पाऊस पडल्यानंतर लगेच गोल तणनाशक फवारणी करावी. भातरोपास सिलिकॉन झिंक सल्फेट वापरणे, रोपाचे वय २१ दिवस झाले की पुर्नलागवड, रोपाची हेक्टरी संख्या नियंत्रित ठेवणे, दोरीन्याच्या सह्याय्याने नियंत्रित लागवड आणि चारसूत्री लागवड पद्धतीने लागवड केल्याने उत्पादन जास्त मिळते, असे शास्त्रज्ञ डॉ. संदीप कदम यांनी सांगितले.
कृषी पर्यवेक्षक नागनाथ शिंदे यांनी कृषी विभागाच्या योजनाबाबत माहिती दिली. कृषी सहायक शितल गिरी यांनी भातपीक जैविक विज प्रक्रियाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात सरपंच कुसुम केदारी, कृषीमित्र भरत तुपे. कृषी सहायक अर्चना वडेकर, स्मिता कानडे, प्रमिला भोसले, अश्विनी खंडागळे, मनीषा घोडके आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहायक शितल गिरी, प्रगतशील शेतकरी नितीन तुपे, आमोद गांधी, खंडू तुपे, बजरंग तुपे यांनी केले.

error: Content is protected !!