वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या कार्याध्यक्ष पदी शंकर रघुनाथराव मोढवे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष संजय शेडगे यांनी त्यांची निवड जाहीर केली.
आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते मोढवे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे,कार्याध्यक्ष साहेबराव कारके, महिला अध्यक्षा दिपाली गराडे,युवक अध्यक्ष किशोर सातकर यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनिर्वाचित कार्याध्यक्ष शंकर मोढवे म्हणाले,”आज माझ्या सोशल मीडिया कामाची पोहच पावती मिळाली. मावळचे जनसेवक आमदार सुनिल आण्णा शेळके,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे व मावळ तालुका राष्ट्रवादी काँ.सो.मि.अध्यक्ष संजय भाऊ शेडगे यांनी माझी मावळ तालुका सरचिटणीस पदा वरुन मावळ तालुका रा.काँ.सो.मि.कार्याध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल मी आभारीआहे.
मी रा.काँ.पक्षाची धेय धोरणे व मावळचे जनसेवक आमदार सुनिल आण्णा शेळके, सं.तु.स.सा.का.उपाध्यक्ष बापू आण्णा भेगडे साहेब,ता.अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे,मा.अध्यक्ष बबनभाऊ भेगडे,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व रा.काँ.पार्टीचे अनेक पदावर काम करणारे पदाधिकारी यांची कामे जनते पर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिक केल्यामुळे मला ही कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
मावळचे जनसेवक आमदार सुनिल आण्णा शेळके,रा.काँ.अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे,सोशल मिडिया अध्यक्ष संजयभाऊ शेडगे यांनी माझ्यावर ठवलेला विश्वासाची जबाबदारी मी विश्वासपूर्वक पार पाडेल.

error: Content is protected !!