LFW या संस्थेअंतर्गत मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व आंतर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळेचे अभूतपूर्व यश
जांभूळगाव:
LFW या संस्थेअंतर्गत 2021- 22 मध्ये WPC ( word Power Championship ) ही स्पर्धा नुकतीच मुंबई येथे आयोजित करण्यात आली.यामध्ये इयत्ता चौथीच्या वर्गातील सुमारे अठराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.त्यात सर्वांत प्रथम एलिमिनेशन राऊंड,क्वार्टर फायनल,सेमी फायनल हे राउंड ऑनलाइन घेण्यात आले. फायनल राऊंड हा मुंबई येथे झाला.
या स्पर्धेमध्ये जांभूळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सार्थक ओव्हाळ याने प्रथम क्रमांक,खुशी नवघरे हिने द्वितीय क्रमांक तर रुद्र साबळे या दुसरीतील विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले.त्यांना कविता जोशी व रेखा दाभोळकर यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर पुन्हा आंतरराज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी यश संपादन करुन मावळचा डंका देशभर वाजवला.स्पर्धेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांना लॅपटॉप,सायकल,मोबाईल फोन इयरफोन,गिफ्ट व्हाउचर्स यांसारखी भरघोस बक्षिसे देण्यात आली.बक्षिस वितरण समारंभात संस्थेचे संचालक प्रणील नाईक उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कान्हे केंद्राचे केंद्रप्रमुख राहुल गुळदे,जांभूळ शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जगताप सर्व शिक्षक वृंद यांनी समाधान व्यक्त केले.
जांभूळ गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे जांभूळ परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे .

error: Content is protected !!