
शाफलर कंपनी मार्फत उन्हाळी शिबिर
टाकवे बुद्रुक:
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाने मुलांमधे निर्माण झालेली बंदिस्तपणाची भावना दुर करण्यासाठी तसेच उन्हाळा सुटीतील मोकळा वेळ वाचनासाठी उपलब्ध व्हावा यासाठी दीपक फाऊंडेशनच्या माध्यमातून उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उन्हाळी शिबिरामध्ये विविध टाकाऊ घटकांपासून टिकाऊ गोष्टी बनविणे, कोलाज काम, विविध वस्तू वापरून ठसे करून चित्र काढणे, तर्क करून गोष्ट लिहिणे, चित्रकला, कथाकथन, वैज्ञानिक दृष्टिकोन समजण्यासाठी रॉकेट लाऊंचींग सत्र असे विविध उपक्रम राबविले गेले.
आंदर मावळ भागातील वडेश्र्वर, वहाण गाव , खांडी, मेटल वाडी, मालेगाव, कुणे अनसूटे, इंगळून, कल्हाट निगडे नानोली आंबळे या शाळांतील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमांत हिरारीने सहभाग नोंदविला.
शाफलर इंडिया प्रा लि. तळेगांव प्लांट च्या सीएसआर प्रकल्पातून सदर उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. संस्थेच्या ज्योती गाते, रोहिणी बडगुजर, प्रिया अवघडे, अजय बाविस्कर, सतीश थरकुडे, मंगेश शिवले यांनी उपक्रमासाठी मेहनत घेतली, सर्वच गावातली ग्रामस्थांचे उपक्रमाला सहकार्य लाभले, मुलांनी आनंद व्यक्त केला.
- कोथुर्णेच्या पिडीतीला न्याय कधी?आमदार सुनिल शेळके विधी मंडळात कडाडले
- कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
- आढले बुद्रुक येथे ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण
- विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
- पर्वती माणकु काळे यांचे निधन





