लोणावळा:
मैत्रीचे नाते घट्ट करण्याचा व एकमेकांना जीवनभर मदत करण्याचा संकल्प गेट-टुगेदर-२ या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी हा संकल्प करण्यात आला.
वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाची १९८८ ची इयत्ता दहावीची बॅच,या बॅचचे गेट-टुगेदर लोणावळ्या जवळ निसर्गरम्य व थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या अशा मळवली येथील संपर्क संस्थेमध्ये संपन्न झाले. या बॅचने गेल्या वर्षी ही गेट-टुगेदर हा कार्यक्रम पहिली ते दहावीच्या शिक्षकांसोबत घेतलेला होता.
यावर्षी हा गेट-टुगेदर -२ या कार्यक्रमाचे दोन दिवसाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात शनिवार २१ मे रोजी सकाळी होऊन २२ मे रोजी संध्याकाळी सांगता झाली.
२१मे रोजी दुधविरे खिंड, लोहगड किल्ला,भाजेलेणी , संपर्क बालग्राम भेट, लायन्स पॉईंट,नारायणीधाम मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२मे रोजी सकाळी आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. दुपारी संपर्क संस्थेच्या सभागृहांमध्ये *ठेवा आठवणीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यात वाशी, लातूर, नांदेड, बीड, पुणे व मुंबई येथील६०वर्गमित्रांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून संपर्क संस्था भाजे तालुका मावळ जिल्हा पुणेचे संस्थापक सचिव मा.श्री अमित कुमार बॅनर्जी साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आपली ओळख करून देत दहावीनंतर आपण कसे घडलो, जीवनामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या,सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहोत. असे सांगत आपला परिचय करून दिला.
याशिवाय काहींनी आपले मनोगत ही व्यक्त केले. यामध्ये श्री सुरेश कवडे, अनिल रसाळ, प्रसाद जोशी, माजी सैनिक महादेव कवडे, संतोष गायकवाड,पांडुरंग कवडे, श्रीमंत जगताप, मुजावर एम. आय.,रमेश जाडकर, सल्लाउद्दीन सय्यद,अभिनव देशमुख व इतरांचा समावेश होता. बॅनर्जी साहेबांनी आपले विचार व्यक्त करताना “संस्था कशी घडली याविषयी माहिती दिली व पुढील कोणतेही काम करताना नियोजन करून कृती करावी.
सर्व वर्ग मित्रांना समाज कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. पुढील कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या”. कार्यक्रमाच्या शेवटी आठवण म्हणुन कार्यक्रमां मध्ये सहभागी सर्वांना “आठवणीचा ठेवा”ही ट्रॉफी बॅनर्जी साहेबांच्या हस्तेभेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्तात्रय चाळक यांनी केले. सूत्रसंचालन श्री शिवकरण गोसावी यांनी केले तर आभार श्री प्रसाद जोशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुरेश कवडे, प्रसाद जोशी, संतोष गायकवाड, महादेव कवडे, दत्तात्रय चाळक, श्रीमंत जगताप व पुण्यातील सर्व वर्गमित्रांनी विशेष मेहनत घेतली होती.

error: Content is protected !!