सेवाधाम येथील बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीर
कान्हे:
येथील सेवाधाम येथील बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीरात योगा, मृदूंग वादन, गायन, हरिपाठ यांचे धडे, तसेच ह.भ.प. विष्णू महाराज खांडेभराड (आळंदी) यांचे कीर्तनाने शिबीराची सांगता झाली. उद्योजक रमेशचंद्रजी व्यास यांचेतर्फे व परमवीरसिंहजी दांतस्टेट यांचे हस्ते व माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे उपस्थितीत रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचेवतीने आयोजित या कार्यक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. यावेळी शिबीरातील बालवारकरी यांनी कीर्तनाला साथ दिली. त्यांना वारकरी पोशाख देण्यात आले.
या १५ दिवसाचे शिबीरात गायनाचार्य किरणजी परळीकर, अरूण महाराज येवले, व्याख्याते विवेक गुरव, योगाचार्य विवेक तिवारी, आळंदी येथील ह.भ.प.मुकुंद कुलकर्णी, मनशक्ती च्या भानुमती सुनिल वैद्य आणि सुनिल भानुदास वैद्य तसेच विशेष सहकार्य राधा कल्याणदास दर्यानानी असे मार्गदर्शन लाभले.
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे उपाध्यक्ष दिलीप वावरे, सचिव रामदास पडवळ, खजिनदार भरतशेठ येवले, कार्याध्यक्ष शिवाजी पवार, सहखजिनदार सुभाषमहाराज पडवळ, कायदेशीर सल्लागार सागर शेटे, मार्गदर्शक महादु नवघणे, नितीन आडीवळे, बजरंग घारे , पंढरीनाथ शेटे, दिपक वारिंगे आदींचे उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी स्वामी निरजानंद महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पवनमावळ विभाग अध्यक्ष शांताराम लोहर, आंदरमावळ विभाग अध्यक्ष दिपक वारिंगे, आंदर मावळ विभाग अध्यक्ष महेंद्र ढोरे आदी उपस्थित होते. यावेळी संभाजी कराळे, मुकूंद ठाकर, सुकनशेठ बाफना, देवराम सातकर, योशेश मोकाशी, संतोष कुंभार, समीर ठाकर, शांताराम गायखे, आदींनी भरघोस योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम व शिबीराचे यशस्वितेसाठी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराच्या नियोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प.शांताराम गायखे, उपाध्यक्ष रोहिदास जगदाळे, सचिव बळवंत येवले, सदस्य भाऊ रासे, सुखदेव गवारी, रोहिदास खांडेभरड, मोहन कदम, सोमनाथ सातपुते, सखाराम घनवट, रामचंद्र कालेकर, सोमनाथ सावंत, बाळासाहेब देशमुख, सुरेश भांगरे, , दत्ताञेय घोजगे, दत्ताञेय घोजगे, चंद्रकांत सातकर, सदाशिव विकारी, बाळासाहेब राजिवडे, वारकरी सेवा समिती अध्यक्ष देवराम सातकर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आरोग्य सेवा समिती अध्यक्ष सुनिल महाराज वरघडे, सचिव सोनाली शेलार, निधी संकलन अध्यक्ष संतोष कुंभार, दत्ताञेय चोपडे, मोहन कदम, लोणावळा विभागप्रमुख भिवाजी गायखे, देवलेचे सोमनाथ सावंत, दत्ता ठाकर, सोशल मिडीया सदस्य मच्छिंद्र मांडेकर, भाऊसाहेब हुलावळे, रवि ठाकर आदी शिबीरास मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!