मुंबई:
कामगार नेते कै.कॅा. गुलाबराव गणाचार्य यांचे नावे आर्थर रोड नाक्यावर चौक आहे या चौकात छोटे खाणी त्यांची आठवण म्हणुन सुरेख असे स्मारक शिल्प आहे.हे शिल्प दररोज येतां जाता पहातो पण आज कॅा. गुलाबराव गणाचार्य यांचे चौकात येरवी पेक्षा जास्त वेळ थांबलो.
यावेळेस स्मारकाच्या येथे उभे राहीलो तर समोरच एक उभा पण अर्ध्या पेक्षा जास्त जमिनीत गाडला गेलेला दगड दिसला हा दगड जवळ जावुन पाहीला तर तो ब्रिटीश कालीन मैलाचा दगड निघाला.ब्रिटीशांनी भारतावर सत्ता मिळवली पण आपण सत्तेत आल्यानंतर त्यांना भारत देश याचा आकार नक्की कसा आहे ? याची लांबी रूंदी किती आहे ? याचा काहीच थांग पत्ता नव्हता आपली सत्ता टिकवायची असेल तर भारत देशाची मोजणी करून त्याचा आकार लांबी, रूदी किती भौगलीक परिस्थिती काय आहे.यांची माहीती पाहीजे होती या साठी त्यांनी लंडनच्या धर्तीवर भारत देशाची मोजनी केली व मोजणी करताना मैलात मोजमाप मोजले त्या मुळे जेथे मैल पुर्ण झाला तेथे मैलाचा दगड बसवला.अशा प्रकारे मुंबईत काही ठिकाणी मैलाचे दगड बसवण्यात आले.
ब्रिटीशांना देशातुन हाकलून लावले तरी त्यांच्या आठवणी आजही दडून आहेत. मुंबईतही ब्रिटीशांनी बांधलेल्या सीएसटीसह महापालिका मुख्यालय, राजाबाई टॉवर्स, हायकोर्ट आदी इमारती आजही मुंबईकरांसह पर्यटकांना भुरळ पाडतात. एवढेच नव्हे तर ब्रिटीशांच्या काळातील अनेक वस्तू भूगर्भात दडलेल्या आहेत. यातील एक मैलाचा मोजमाप दर्शवणारा ब्रिटीशकालीन दगड
पूर्वी रस्त्यांवरील अंतर हे मैलावर मोजले जात असे. मात्र, आता ते किलोमीटरमध्ये मोजले जाते. परंतु किलोमीटरमध्ये दर्शवणारे दगड कुठेही लावण्यात आलेले नाहीत. ब्रिटीशांच्या काळात मुंबईतील रस्त्यावर सन 1816 ते 1837 च्या काळात असे मैलांचे दगड लावले होते. परंतु मुंबईचा विकास आणि नगररचना यामध्ये ब्रिटीशांनी रोवलेले मैलाचे दगड हे काढले गेले तर काही ठिकाणी जमिनीखाली गाडले गेले. तर काही ठिकाणी ते चांगल्या स्थितीत आहेत.
हा दगड चांगल्या स्थितीत आहे आणी मोक्याच्या जागी आहे. या मैलाच्या दगडाचे संवर्धन केले गेले पाहिजे, असे मत सुभाष तळेकर,अध्यक्ष ,मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी केले.

error: Content is protected !!