वडगांव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या सोशल मिडिया अध्यक्ष पदी बाबूराव विलास खंडागळे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष मंगेश खैरे यांनी त्यांची नियुक्ती केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक अध्यक्ष किशोर सातकर, महिला अध्यक्षा दिपाली गराडे उपस्थित होत्या.
पक्ष संघटना वाढीवर भर देणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.

error: Content is protected !!