
वडगांव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब खंडागळे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष मंगेश खैरे यांनी त्यांची नियुक्ती केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक अध्यक्ष किशोर सातकर, महिला अध्यक्षा दिपाली गराडे उपस्थित होत्या.
पक्ष संघटना वाढीवर भर देणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.
खंडागळे माळेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून पुणे जिल्हा परिषदेच्या आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आंदर मावळातील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार वाखण्या सारखा आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




