कामशेत:
मावळ तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत ८२ नळ पाणीपुरवठा योजना मंजूर असुन ५१ योजनांचे काम सुरू आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. मावळ तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके अग्रेसर आहेत,असे वक्तव्य राष्ट्रवादी महिला मावळ तालुकाध्यक्ष दिपाली गराडे यांनी केले.
मावळचे आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून वाडीवळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत 40 लाख निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी सोमवारी (दि.१६) त्या बोलत होत्या.
यावेळी कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्ष सारिका शेळके, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच नवनाथ हेलम, उपसरपंच चंद्रभागा कदम, सदस्य भारती थोरवे, राणी जाधव, गोरख बांगर, सागर रणपिसे, कैलास वाघमारे, ग्रामस्थ काळूराम थोरवे, सनी जाधव, माजी सरपंच महादू थोरवे, प्रकाश थोरवे, अमोल थोरवे, पोलीस पाटील सविता वरघडे, कैलास थोरवे, उल्हास थोरवे, आकाश थोरवे, संजय थोरवे, ठेकेदार अतुल दाभाडे व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामराव थोरवे व सागर रणपिसे यांनी केले. सूत्रसंचालन काळूराम थोरवे यांनी केले. आभार रामदास थोरवे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!