पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता बबूशा भांगरे यांना ‘स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड व सचिव भरत शिंदे यांनी भांगरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर केल्याचे पत्र दिले आहे.
८मे २०२२ला सिद्धीविनायक हाॅल,चिंचवडे लाॅन्स चिंचवडगाव येथे सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. संस्कार प्रतिष्ठानच्या १७व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले जाते.
महिला महिला सक्षमीकरणावर भर देत,गावातील महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर काढून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबणा-या महिला सरपंचांच्या यादीत निगडे ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबूशा भांगरे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे.
स्मार्ट व्हिलेज कडे वाटचाल करणा-या निगडे गावच्या सरपंच सविता भांगरे यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. यासाठी त्यांनी चार वर्षात गावात विविध प्रशिक्षण शिबीरे घेतली असून गावातील महिलांचा आत्मविश्वास वाढीसाठी प्रयत्न केला आहे.
भांगरे यांंच्या सासरी राजकारणाचा कोणातच वारसा नाही. मात्र त्यांच्या माहेरी त्यांचे वडील बबनराव गावडे साते ग्रामपंचायतीचे सदस्य होते. राजकारणाचा हाच धागा पकडून मागील पंचवार्षिक निवडणुकीत सविता भांगरे यांना त्यांच्या पॅनल मधील कार्यकर्त्यांनी आग्रहाने निवडणुकीत उभे केले. आणि त्या चार वर्षापूर्वी प्रथम लोकनियुक्त सरपंच झाल्या.
सरपंच पदाची हवा डोक्यात जाऊ न देता पाय जमिनीवर ठेवून डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असा स्वभाव अंगी बाळगून त्यांनी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले.
यासाठी शाळा,अंगणवाडी ही बलस्थाने निवडून त्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली.
पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.मुख्यत महिला सक्षमीकरणाची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी
महिला प्रशिक्षण भर दिला. शिवणकाम,ब्युटी पार्लर,केक बनविणे,मसाले बनवणे,हस्तकला प्रशिक्षण, महिला बचत गटाचे जाळे विणले. महिला उद्योजक प्रशिक्षण सुरू केली आहेत.
यापूर्वी त्यांना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अखिल भारतीय सरपंच परिषद मावळ तालुका उपाध्यक्ष पद
या शिवाय शिवसेनेने पुरस्कार देऊन सन्मान केला. ग्रामपंचायत कार्यालय,भव्य सभामंडप ही भविष्यातील कामे दृष्टीक्षेपात आहे. सर्व सण सभारंभात महिला दिन आवडता सोहळा.या सोहळ्यात काबाडकष्ट करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना ‘ श्रमप्रतिष्ठा ‘पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,याचे फार समाधान आजही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. गावातील पद्मावती देवी,कळमजाई देवीची मंदिरे त्यांची श्रद्धास्थाने. ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांवर प्रचंड निष्ठा या सर्वाच्या आशीर्वादाने सार्वजनिक कामासाठी अधिक बळ मिळते,असा त्यांचा दृढविश्वास आहे.
गावहायमॅक्स दिव्याने गाव उजळून गेले आहे. पथदिवे अन सौरदिवे गावची शोभा वाढवित आहे,उजेड देत आहे. या पुढे ही नाळ अशीच जोडून स्मार्ट व्हिलेज कडे वाटचाल करण्यासाठी महिलांचा सहभागातून अधिक नेटाने काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

error: Content is protected !!