टाकवे बुद्रुक :
येथील ग्रामपंचायत हद्दीमधील दत्तनगर या भागात ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी वेळ होत असल्या कारणाने या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भभल्यामुळे पिण्याच्या पाण्याची चणचण भासू लागली आहे.
दरम्यान पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे पाईपलाईनच्या बाजूला खड्डा घेऊन त्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी भरावे लागत आहे. परिणामी या होणाऱ्या त्रासामुळे महिला पाठीच्या आजाराने बेजार होऊ लागल्या आहेत.
परिणामी या भागातील पाण्याचे नियोजन कोलमडल्या मुळे येथील नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे टँकरचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली आहे. दरम्यान टँकरचे पाणी विकत घेतल्यामुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे, या भागात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच परशुराम मालपोटे यांच्याकडे निवेदन सपूर्त केले आहे.
या वेळी निवेदन देताना लिलाबाई ढगे, मंगल पिंगळे, ताईबाई नाणेकर, फुलाबाई लंके,नयना पिलाने, जनिता शिंदे, स्वाती खरमारे,नंदा नाणेकर, यांसह या भागातील अनेक महिला उपस्थित होत्या.
गावामध्ये पाणी आल्यानंतर नळ कनेक्शनलाच मोटारी लावून त्या ठिकाणी पाण्याची चोरी होत आहे या संबंधात ग्रामपंचायतीने अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. काही नागरिकांच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांना पाणी पिण्यास उपलब्ध होत नाही. पिण्याच्या पाण्याची भरदिवसा चोरी होत असताना ग्रामपंचायत जाणून-बुजून या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच गावांमध्ये सद्यस्थिती कोणत्याही नळाला तुटी लावल्याचे दिसून येत नाही किंवा संबंधित ग्रामपंचायत याठिकाणी नागरिकांना तूटी लावण्यासाठी सूचनाही करत नाहीत. परिणामी या कारणांमुळे काही नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान नळाला मोटारी लावणाऱ्या नागरिकांवर आतापर्यंत जप्त केल्या नाही किंवा त्यांवरची कारवाई अद्याप झालेली नाही.
परिणामी ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुकच्या भोंगळ कारभाराचा विचार करता वडगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी सुधीर भागवत यावरती काय सूचना ग्रामपंचायतीला करणार याकडे संबंधित नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

error: Content is protected !!