भोरगीरी – भिमाशंकर रस्ता होणार कधी ?
भीमाशंकर:
शिवशंकराची संपुर्ण भारतात बारा ज्योतिर्लंग आहेत त्या पैकी सहावे ज्योतीर्लिंग भिमाशंकर हे तालुका खेड जि. पुणे मध्ये आहे.
भिमाशंकर तीर्थक्षेत्र जरी खेड तालुक्यात असले तरी त्याला खेड तालुक्यांतून जाण्यासाठी रस्ता उपलब्द नाही. खेड- वाडा मार्गे भिमाशंकर कडे येणारी वहातुक मंदोशी किंवा कारकुडी घाटाने तळेघर म्हणजे आंबेगाव तालुक्यात वळवली जाते व तेथुन पुढे ही वहाने भिमाशंकर कडे जाते.
खेड तालुक्यांतील शेवटचे गाव भोरगीरी येथुन भिमाशंकर सात किलो मिटर आहे त्यातील कोतुरन पर्यंत जाण्यासाछी रस्ता उपलब्द आहे काही खाजगी वहाने तेथ पर्यंत जातात पण तेथुन पुढे दोन किलो मिटर रस्ता उपलब्द नाही त्या मुळे खेड तालुक्यातुन वहानाने भिमाशंकरला थेट जाता येत नाही.
भोरगीरी- भिमाशंकर मार्गाची मागणी गेली पन्नास वर्षाची आहे प्रत्येक लोकप्रतीनिधी निवडणुकीत आश्वासन देतो की मी निवडून आलो की भोरगीरी- भिमाशंकर रस्ता तयार करीन पण ते एकदा निवडून आले की आश्वासन विसरून जातात. वनखाते रस्ता बनवायला परवांनगी देत नाही असे म्हणुन रस्ता न बनन्याचे खापर वनखात्यावर फोडतात. हा तर एक बहाणा आहे याच भिमाशंकर अभयारण्य क्षेत्रात ऐनरकॅान कंपनीच्या किमान पन्नास पवनचक्या आहेत या सर्व पवनचक्या डोंगर माथ्यावर आहे तेथे जाण्यासाठी कंपनीने रस्ते तयार केले आहेत. त्यांची लांबी मोजली तर ती शेकडो किलो मिटर होईल. एक कंपनी भिमाशंकर अभयारण्यात शेकडो किलो मिटर रस्ता बनवते आणी भोरगीरी – भिमाशंकर दोन किलो मिटरचा रस्ता होत नाही असे का ?
सुभाष तळेकर म्हणाले,”
खेड तालुक्याती पश्चिम भागातील नागरीकांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे कडे मागणी आहे की आपण जातीने लक्ष घालुन हा दोन किलो मिटरचा बनवावा असे झाले तर खेड तालुक्यांतून वहानाने भिमाशंकरला थेट जाता येईल.

error: Content is protected !!