स्व.हुलासीबाई अंबरचंदजी मुथा सभागृहाचे वडगांव मध्ये लोकार्पण
वडगांव मावळ:
श्री पोटोबा महाराज देवस्थान चे अधिपत्याखाली सुरू असलेल्या श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार जवळील देवस्थान चे जागेवर असलेल्या सभामंडपास, स्व.हुलासीबाई अंबरचंदजी मुथा,असे नामकरण करून त्या सभागृहाचे मावळ भूषण ह भ प तुषार महाराज दळवी यांचे शुभहस्ते व खिवराज मुथा व सौ.सुशीला मुथा यांचे प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
वडगांवचे व्यापारी मुथा परिवारातील आनंदराम, सुभाषचंद्र, खिवराज, पृथ्वीराज, संतोष अंबरचंदजी मुथा या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचे वतीने सदर सभामंडप देवस्थान ला बांधून देण्यात आला.
अक्षय्यतृतीया च्या शुभमुहूर्तावर त्याचे लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. दळवी महाराज म्हणाले,” समाजत अनेक गडगंज,कोट्याधीश लोक,पैसेवाले आहेत,परंतु दातृत्व,दान, दानत करण्याची वृत्ती ठराविकच लोकांमध्ये दिसत आहे व त्यातीलच असणारा हा मुथा परिवाराने हे सभामंडप बांधलेबद्दल त्यांचे कौतुक केले.
श्री पोटोबा देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी देवस्थान चे वतीने मुथा परिवाराचे आभार मानले. सभामंडप बांधणेसाठी नगरसेवक भूषण मुथा यांनी विशेष प्रयत्न केले
यावेळी उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, जेष्ठ नेते चंपालाल मुथा,मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, देवस्थान विश्वस्त सचिव अनंता कुडे,किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे,अँडअशोकराव ढमाले,अँड तुकाराम काटे, सुभाषराव जाधव,सुनिता कुडे ,
मावळ दिंडी चे सचिव तुकाराम गाडे ,वडगांव नगरपंचायत चे भाजपचे गटनेते,दिनेश ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण,भूषण मुथा,प्रसाद पिंगळे,पत्रकार सुदेश गिरमे,मारुती चव्हाण मा.सरपंच पोपटराव वहिले,,वडगांव सोसायटीचे व्हाईस चेअरमन निलेश म्हाळसकर,संचालक किसनराव वहिले,प्रकाश कुडे,ऍड अजित वहिले, गणेश भालेकर, लायन्स क्लब चे अध्यक्ष दिलीप मुथा,मा उपसरपंच सुधाकर ढोरे,भरतशेठ म्हाळसकर, पुजारी मधुकर गुरव,अजित मुथा, अमोल मुथा,खंडूशेठ भिलारे, ॲड.अमित मुथा, रोहन मुथा, गणेश गवारे,आदिंसह संपूर्ण मुथा परिवार व ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे, प्रस्ताविक सुभाषराव जाधव व आभार किरण भिलारे यांनी मानले.

error: Content is protected !!