माळेगाव खुर्द:
शिक्षण क्षेत्रात कार्यरत घटकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करावे असे अवाहन करीत शिक्षण समृद्ध होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज आहे असल्याचे प्रतिपादन मावळ पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले .
माळेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख तथा पं. स.मावळ तळेगाव बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल किसन माकर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब राक्षे बोलत होते.. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेचे माजी राजाध्यक्ष वि.म.शिंदे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड,विजय चौहान,मुख्याध्यापक प्रमिला भालके, शिवाजी भोर,सरपंच रोहीणी कोकाटे,ग्रामपंचायत सदस्या कुंदा बोऱ्हाडे,माजी आदर्श सरपंच बाळासाहेब खंडागळे,राजेश कोकाटे,पो.पाटील जालिंदर मेटल,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गबळू लांघी,दशरथ दगडे,भाऊ बोऱ्हाडे,महादू सुपे,किसन सुपे,बाळासाहेब घाडगे,मावळ तालुका प्राथ. शिक्षक संघाचे अध्यक्ष गेनू मोरमारे,सुभाष गोफणे,गणेश चासकर,त्र्यंबक आहेर,राजेश गडकरी,राहूल गुळदे,मलीक कांबळे,रघूनाथ मोरमारे,गंगाराम केदार ,उमेश विश्वासराव आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मावळ,खेड,मुळशी तालुक्यातील जि.प.चे अनेक शिक्षक उपस्थित होते.
यावेळी श्री सुनिल माकर यांचा केंद्रातील जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वतीने शाल,श्रीफळ,सन्मानपत्र आणि विठ्ठल रूक्मीनी ची मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर पंचक्रोशीतील वेगवेगळ्या संघटना व संस्थेच्या वतीने श्री माकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांमधून कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.शंकरराव सुपे.माजी पं.सं.सभापती मावळ यांचे सह मान्यवर पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून श्री माकर यांच्या कारकीर्दीतील केलेल्या कार्याचे कौतूक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे नियोजन मधुकर गंभीरे,शिवकांता गीते,शितल दंडवते यांचे सह केंद्रातील शिक्षकांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण वैद्य यांनी केले सूत्रसंचालन नामदेव गाभणे यांनी केले तर आभार मधुकर गंभीरे यांनी मानले.

error: Content is protected !!