गडद:
भामनेर मधील रस्त्यांची जागो जागी चाळण झाली आहे. चाकण- वांद्रे, हा रस्ता वहागाव पासुन पुढे वांद्रे च्या दिशेने खुपच खराब झाला आहे. तसेच या रस्त्यावर चांभार कुंड कोळीये आणी लोहदरा गडद येथे पुल होणे गरजेचे आहे.
रस्ता अरूंद असल्यामुळे हा रस्ता मृत्युचा सापळा झाला आहे तर तिकडे खेड-पाईट-भलवडी रस्त्याची अवस्था दैनिय झाली आहे. हा संपुर्ण रस्ता उंदराने दोन्ही बाजूने कुरतडला आहे की काय अशी स्थिती आहे. या दोन्ही रस्त्यांची दुरूस्थि तातडीने होणे गरजेचे आहे.
कारण हे काम पावसाळ्या पुर्वी झाले पाहीजे. हे रस्ते अरूंद आहेत त्या मुळे या रस्त्यांनवर एकेरी वहातुक चालते. एकतर एकेरी वाहतूक आणि त्यात माती खडीचे मोठाले हायवा ढंपर यांची रात्रं दिवस या रस्त्यांवरून वाहतूक चालू असते. आणि त्याचा वेग खुप आसतो कधिही मोठा आपघात होऊन मोठी जिवीत हानी होऊ शकते.
हे ढंपर रस्त्याच्या खाली उतरत नाही आणि वरून आरेरावीची भाषा वापरतात त्यांचेवर राजकीय वरदहस्त असल्या मुळे तहसीलदार व पोलिस ही त्यांचेवर काहीही कारवाई करत नाहीत. त्याच्या वर कोणाचाही अंकुश राहीलेला नाही.
मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
वहागाव- वांद्रे व शिरोली- भलवडी या दोन्ही रस्त्याचे दुरूस्तीचे काम लवकरात लवकर झाले पाहीजे ही येथील जनतेची मागणी आहे.

error: Content is protected !!