वडगांव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मध्ये सुमारे दोन कोटी बावीस लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या निधीतून तसेच नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांच्या प्रयत्नाने सुमारे दोन कोटी बावीस लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन करण्यात आले.
नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, राहुल ढोरे, शारदा ढोरे, माया चव्हाण यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी विविध कार्यकारी सोसायटी संचालक राजेश भालेराव, संचालक प्रकाश कुडे सामाजिक कार्यकर्ते बिहारीलाल दुबे, सुधाकर वाघमारे, रा. काँ.वडगाव शहराध्यक्ष प्रविण ढोरे, उपाध्यक्ष संतोष खैरे, अविनाश कुडे, मंगेश खैरे, शरद ढोरे, दिपक भालेराव, विशाल वहिले, अनिल ओव्हाळ, सोपान पाटोळे, सचिन ओव्हाळ, अशिष भालेराव, गणेश पाटोळे, सिद्धार्थ भालेराव, सागर पाटोळे, गौतम सोनवणे, सोमनाथ धोंगडे, राहिल तांबोळी आणि प्रभागातील नागरिक, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळचे आमदार सुनिल शेळके, वडगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांच्या माध्यमातून तसेच मागासवर्गीय निधीतून या प्रभागात विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. यात प्रामुख्याने ७७ लक्ष रुपये खर्चून मिलींदनगर ते कुडेवाडा रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त ड्रेनेज लाईन करण्यात येणार आहे. तसेच एलईडी लाईट्सचे सुमारे ६५ लक्ष ८० हजार रुपयांतून साधारणता पंचवीस फुट उंचीचे खांब उभारण्यात येणार आहेत. तसेच प्रभागात ७३ लक्ष खर्चून कुडेवाडा, मिलिंनगर, लक्ष्मीनगर परिसरात बंदिस्त ड्रेनेज लाईन करणे, नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे याव्यतिरिक्त खैरे ते जाधव निवासस्थानापर्यंत ३ लक्ष रुपयांची बंदिस्त जीआय पाईपलाईन टाकणे अशी सुमारे २ कोटी २२ लक्ष रुपयांची विविध विकासकामांना लवकरच सुरूवात होणार आहे.

error: Content is protected !!