कामशेत: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पंडित नेहरू विद्यालयात जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अजिनाथ ओगले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे महत्व उपस्थित विद्यार्थी व पालकांना सांगितले.
यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य उमेश सोनवणे, पर्यवेक्षिका धनश्री साबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सुषमा करपे, पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद वाजे, सूत्रसंचालन नितीन शेलार, आभार प्रदर्शन दत्तात्रय पोवार यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!