महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वडगांव नगरपंचायत नगराध्यक्षांचा कौतुकास्पद निर्णय
वडगाव मावळ:
वडगांव नगरपंचायत आवारात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमी प्रमाणे शहराचे प्रथम नागरिक १५ ऑगस्ट, २६ जानेवारी तसेच १ मे रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगराध्यक्ष यांच्या हस्ते होत असतो.
यावर्षी मात्र नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी ह्या परंपरेला फाटा देत नगरपंचायत मधील आरोग्य कर्मचारी श्री. बाळू ओव्हाळ यांना मान देताना त्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
शहरातील नागरिकांना स्वच्छतेसंबधित अविरत सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींमध्ये सफाई कर्मचारी हा नेहमीच आग्रभागी असतो. सफाई कर्मचारी वेळप्रसंगी आपल्या आरोग्याची काळजी न घेता आपले कर्तव्य पार पाडत असतो. याची जाणीव ठेऊन स्वच्छता कर्मचा-यांचा आज ख-या अर्थाने एक सन्मान व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केला.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पूनम जाधव, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, शारदा ढोरे, प्रमिला बाफना, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, नगरपंचायत अधिकारी तसेच सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा व सन्मानिय नगरसेवकांनी सर्व कर्मचारी बांधवांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!