
निगडे:
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने निगडे येथे ग्रामपंचायतचे कर्मचारी सहादु ठाकर व संजय तात्या भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
महाराष्ट्र दिन कामगार दिन हा कष्टकरी कामगार लोकांचा.या दिनासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणाची आहुती दिली आहे .कामगारांच्या हितासाठी, हक्कांसाठी लढणाऱ्या महापुरूषांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच सविता बाबुशा भांगरे,उपसरपंच रामदास चव्हाण ,ग्रामसेवक शशी किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे ,मीरा भांगरे ,महेश करपे ,पूजा भागवत ,मनिषा थरकुडे, कर्मचारी वर्ग शिक्षक, शालेय समिती व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच सविता भांगरे म्हणाल्या,’ देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच नेतृत्व महाराष्ट्राकडेच आहे. सबंध देशाचं आर्थिक आणि औद्योगिक इंजिन महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या संघर्षाने झालेली आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे अशा नेत्यांनी तीव्र संघर्ष केलेला आहे. तर या राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. तेव्हा आजचा दिवस हा या संघर्षाला आठविण्याचा दिवस आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे





