गोवित्री ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी योगेश सोपान केदारी यांची बिनविरोध निवड
कामशेत:
२०२१ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माननीय बाळासाहेब नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली गोवित्री ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या पॅनेलच्या माध्यमातून पहिल्यांदा सरपंच म्हणून काम करण्याची संधी संगीता चंद्रकांत मोहोळ यांना मिळाली होती.
त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय मध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडली यामध्ये योगेश सोपान केदारी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले .या निवडणुकीमध्ये सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक झेंडे मॅडम यांनी काम पाहिले.
निवडीनंतर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करण्यात आला .त्याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सद्स्य तसेच माजी चेअरमन रामभाऊ इंगवले, माजी सरपंच रामदास जांभुळकर, माजी उपसरपंच तुकाराम केदारी ,सोपान केदारी (ग्रा.सदस्य ),लक्ष्मण गायकवाड(माजी उपसरपंच ),दत्तात्रय डेनकर, चंद्रकांत मोहोळ, सखाराम केदारी, शिवाजी जांभुळकर, किसन केदारी, कचरू केदारी,दामू केदारी,दिपक केदारी, रमेश केदारी,संतोष बिनगुडे ,सोमनाथ वाडेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!