वडगाव मावळ:
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था व बेलस्टार मायक्रो फायनान्स CSR यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रेडिट प्लस प्रकल्पांतर्गत बऊर गावातील लक्ष्मी नारायण शेतकरी पुरुष बचत गटाला दुग्ध व भाजीपाला विक्रीकरिता व इतर वाहतुकीच्या कामासाठी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया या संस्थे मार्फत लक्ष्मी नारायण शेतकरी पुरुष बचत गटाला बुलेरो पिकअप गाडी विकत घेण्यासाठी काही प्रमाणात अर्थसहाय्य केले.
त्यांचा व्यवसाय वाढवा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी निर्माण करून आणि त्यांच्या व्यवसायासाठी व वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेने मदत केली व आज रोजी बोलेरो पिकप गाडीचे हस्तांतरण कार्यक्रम पार पाडले. यामध्ये हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेचे प्रकल्प अधिकारी अनिल पिसाळ व त्याच प्रमाणे मोसिन शेख प्रोजेक्ट मॅनेजर SDTC आणि शेखर खराडे व मनीषा कारके तसेच लक्ष्मीनारायण बचतगटाचे अध्यक्ष पोलीस पाटील श्रीकांत वाळुंजकर व सदस्य उपस्थित होते आणि गावातील शांताराम वायभट विश्वनाथ वाळुंजकर रोशन शिंदे व भाऊ वाळुंजकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!