


पुणे:
काँग्रेस भवन,पुणे येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेस विचारसरणीने प्रेरित झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देहूरोड येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
मलिक हसन शेख, असिफ इसा सय्यद, हसन शेख, जावेद शेख, हुसेन शेख, जेदिन नाडार, सुरज गायकवाड, अजय बाला, संकेत गायकवाड, आकाश सुतार, अजय रामोशी रवी स्वामी, शरद सोनी व माजी पोलीस अधिकारी आबूबकार लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आगामी काळात देहूरोड परिसरात काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला.
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय चंदूकाका जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच इतर दोन पक्षाला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भविष्यातदेखील आम्ही कधीही तो प्रयत्न करणार नाही. सध्या वर्तमानपत्रातून मावळ परिसरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात सातत्याने येत आहेत.
या निमित्ताने मला मित्र पक्षाला सूचित करायचे आहे की काँग्रेस पक्षाला अनेक जणांनी संपवण्याचा प्रयत्न केला पण तो कधीही संपला नाही .
कारण काँग्रेस जनसामान्यांची मजबूत विचारधारा आहे. तसेच आजही देहूरोड लोणावळा मावळ या ठिकाणी काँग्रेस पक्ष अतिशय सक्षम असून या ठिकाणच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर ती अशा कोणत्याही वाऱ्या वादळाचा काहीही फरक पडणार नाही. जे आता या पक्षातून दुसरीकडे गेले आहेत ते काँग्रेस पक्षात किती दिवस होते याचादेखील अभ्यास करावा असे जगताप म्हणाले.
यावेळी मावळ परिसरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, खजिनदार महेश ढमढेरे, दीपक साचसर वेंकटेश कोळी,गफूरभाई शेख, राणी पाडियन,वैशाली जगताप, संभाजी पिंजण, मेहबूब गोलंदाज, बबन टोपे उपस्थित होते.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन



