वडगाव मावळ:
पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना मान सन्मानाची वागणूक देऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आश्वासन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले.वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार शेळके बोलत होते. पक्ष संघटना वाढीसाठी वेळ द्या,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढे असा कानमंत्रही आमदार शेळके यांनी दिला.
माजी राज्यमंत्री मदन बाफना,आमदार सुनिल शेळके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी अध्यक्ष गणेश ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, नगरसेवक सुनिल ढोरे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष किशोर सातकर, पंढरीनाथ ढोरे,मंगेश ढोरे, च॔द्रजित वाघमारे,गंगाधर ढोरे, महिला अध्यक्षा पद्मा ढोरे, विलास दंडेल, चंदूकाका ढोरे, किसन वहिले, प्रकाश कुडे, राजेश भालेराव, मंगल पिंपळे, उपस्थित होते.
वडगाव शहर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड झालेल्या कार्यकारणीचे सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” वडगाव शहराचे महत्व तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. शहरातील राष्ट्रवादीचे संघटन अतिशय उत्तम आहे.आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिक सक्रीय होणे आवश्यक आहे
वडगाव शहराध्यक्ष प्रविण ढोरे,राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अतुल वायकर यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली.
आमदारांचे काम उत्तम आहे.आमदारांच्या कामाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पंचवीस वर्षा नंतर कामाचा डोंगर उभा करणारे आमदार तालुक्याला लाभले याचा आनंद आहे.
सिद्धेश ढोरे यांनी स्वागत केले. प्रविण ढोरे यांनी प्रास्ताविक केले.अतुल राऊत यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!