वडगाव मावळ:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. २२/०४/२०२२ रोजी सकाळी ९.३० ते २.३० वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळा, कान्हे, ता. मावळ, जि. पुणे होणा-या या मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थीसाठी आरोग्य तपासणी व उपचार मोफत दिले जाणार आहेत. डिजिटल हेल्थ आयडी (युनिक हेल्थ आयडी),आयुष्यमान भारत कार्ड (पी.एम.जे.ए.वाय कार्ड) मोफत तयार करण्यात येतील.
यासाठी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज २ फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधारकार्ड मतदान ओळखपत्र, मुळ कागदपत्रे व सोबत दोन झेरॉक्स प्रति व्यक्ती, आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत ठेवावा लागणार आहे.
सर्व रोग मोफत तपासणी (विशेष तज्ञ डॉक्टरांमार्फत) हृदयरोग, , रक्तदाब, मेंदुचे आजार, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री रोग तपासणी, त्वचा रोग, लहान मुलांचे आजार, किडनी आजार, अस्थिरोग, एच. आय. व्ही. तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग व इत्यादी सर्व आजार
मोफत मार्गदर्शन व तपासणी संसर्ग / असंसर्ग आजार, निरोगी जीवनशैली, सुयोग्य आहार व इतर आजारांचे प्रतिबंधात्मक उपायांचे समुपदेशन किशोर वयीन मुले/मुली, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या याविषयी सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.
सर्व प्रयोगशाळा तपासणी ई.सी.जी., टेली मेडिसीन उपचार ,मनस्वास्थ्य मनशक्ती यांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व समुपदेशन, पथनाट्य व संगीताद्वारे आरोग्य शिक्षण व जनजागृती, कैवल्यधाम योग संस्था द्वारा विशेष योगा मार्गदर्शन, सेव द चिल्ड्रन संस्था, पुणे मायनर मेडिकल कॉलेज व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालय, तळेगाव * डॉ.डी.वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी डॉ. डी. वाय पाटील दंत महाविद्यालय, पिंपरी पायोनियर हॉस्पिटल, सोमाटणे संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा ढाकणे हॉस्पिटल, तळेगाव यांचे सहकार्य आहे.
सुनिल शेळके आमदार, मावळ विधानसभा यांचे विशेष सहकार्य आहे.
विशेषवाब अंतर्गत या मेळाव्या मध्ये रक्तदान शिवीर तसेच नेत्रदान, अवयवदान, देहदान संबंधी स्वयं इच्छापत्र भरून घेतले जाणार आहेत. शिवीरानंतर डॉक्टरांनी निवडलेल्या रुग्णांच्या निवडक रूग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत इतरही सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
श्रीरंग बारणे खासदार मावळ,आमदार सुनिल शेळके,डॉ. भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.पुणे,संदेश शिर्के उपविभागीय अधिकारी,मधुसुदन बर्गे,तहसीलदार,सुधीर भागवत गटविकास अधिकारी, डॉ. चंद्रकांत लोहारे ( तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. मिलींद सोनावणे, डॉ. माधव कणकवले
जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ. इंद्रनील पाटील वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, काले कॉलनी,डॉ. संजोग कदम उपसंचालक आरोग्य विभाग, डॉ. जयश्री ढवळे (वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, डॉ. गुणेश बागडे
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय वडगाव उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!