गडद:
चैत्र महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गडद गावच्या महादेवाचा भंडारा भरतो गेली दोन वर्ष करोना मुळे तो होऊ शकला नाही पण या वर्षी करोनाची सर्व बंधने हटवली गेली आहेत. आता सोमवार दि. २५ /४/२०२२ रोजी भंडारा दणक्यात साजरा होईल.
“गडद”ची कोरीव लेणी
——————
कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्र राज्या चे वर्णन ‘दगडांच्या देशा’ असे केले आहे. हे वर्णन ‘मावळ’ भागाला तंतोतंत लागू पडते. मावळ म्हणट्ले की आर पार पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणी सोबत त्याचा काळा कहार पत्थर पण या काळ्या पत्थरातही अनेक ठिकाणी सौंदर्य लेणी कोरली गेली आहेत.
तसेच काहीसे कोरीव लोणे “गडद” गाव च्या डोंगरावर कोरले गेले आहे.
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील गाव म्हणजे “गडद”
चाकण या औद्योगिक वसाहती पासुन “गडद” गावा पर्यंत एस.टी.ची सोय आहे तर मुंबई अंधेरी (सातबंगला ) येथुन ‘गडद’ साठी थेट एस.टी. आहे. काही कारणा मुळे सध्या ही ST बंद आहे .
चाकण-वांद्रे या रस्त्यावर गडद फाटा येथे उतरल्यावर सर्व प्रथम नजरेत भरतो तो येथला प्रचंड मोठा डोंगर एकाद्या मातेने आपल्या बालकाला आपल्या मीठीत घ्यावे तसा डोंगर गावच्या भोवती पसरला आहे. जसे काही सह्याद्रीच गावाला कवेत घेउन बसला आहे.
फाट्या वरुन गावाकडे चाललेकी वाटेत कौलारू घरे लागतात ती ईतकी सुंदर दिसतात की अगदी चित्रकाराच्या कुंचल्याला ती आव्हान देत असतात.अधुनिक पणा आता घराघरात जाणवू लागला आहे. जुनी चौमोळी कौलारू घरे वेगाने नष्ट होत आहे.
वाटेत काही ओढे नाले ओलांडले की आपण थेट गडद गावात पोचतो. गाव तसा लहान आहे. उंच टेकडीवर तो वसला आहे. अगदी घराच्या दारात उभे राहीले की सर्व खलाटी नजरे च्या टप्प्यात येते.
घराचे दरवाजे तर अभिजात नम्रता शिकवणारे वाकुन चाललो नाही तर डोक्याला टेंगुंळ हे ठरलेलेच. जरी येथील घरे खुरटलेली वाटत असलीतरी येथील मानुसकीची उमेद कधी खुरटलेली नाही.गडद गावात आले की चावडी लागते आता त्या चावडीत विठ्ठल रखुमाई च्या मुर्ती आहेत.
गावात हरीनाम सप्ताह असायचा पण विठ्ठल रखुमाई यांच्या मुर्त्या नसायच्या मग गावातील युवकांनी पुढाकार घेउन विठ्ठल रखुमाई च्या मुर्त्या चावडीत बसवल्या पुढे याच चावडीचे विठ्ठल रखुमाई मंदीर झाले. याच चावडी समोर खुप जुना पिंपरीचा पार होता त्या पाराला चहुबाजूने कोरीव दगडींचा पार होता. या वर युध्दाचे प्रसंग कोरले होते.पण कालाच्या ओघात पार पाडला गेला व तेथे ईमारत बांधली आणी ते सर्व कोरीव दगड त्या ईमारतीच्या पायात पुरले गेले.
येथुन पुढे गेले की भैरवनाथ मंदीर व मारुती मंदीर लागते दोन्ही ही मंदीरे अतंत्य सुरेख आहेत. भैरवनाथ मंदीरा भोवताली तर अनेक विरांच्या मुर्त्या आहेत. अनेक जणांच्या समाध्या आहेत त्याही दगडाचे कोरीव काम करून बनवल्या गेल्या आहेत.
भैरवनाथ आणी मारूतीचे मंदीर नव्याने बांधले आहे ते बांधकाम करत असताना हा प्राचिन वारसा एका बाजुला ढकलून ठेवला आहे.
येथुन पुढे जंगलाची वाट चालू होते मावळ खोर्यात काही ठिकाणी देवराई यांची जपवणुक केली जाते तशीच येथे आंबेराई ची जपवणुक केली आहे. डोंगराच्या तळाशी शेकडो आंब्याची झाडे आहेत. अगदी जुनाट आणी प्रचंड मोठी आकाशाशी स्पर्धा करण्या जोगी.सुर्यकिरण ही येथे जमीनीवर पोचत नाही ईतकी याची घनता आहे.
याच आंबेराईतुन कोरीव लेणी कडे जाणार्या पायर्या सुरू होतात.
पायर्‍या चढत गेलो की पहिला टप्पा लागतो तो महादेवाचा येथे येई पर्यंत दमछाक होते. पण येथे आल्यावर आपल्या समोर एक आश्चर्य दिसते समोर महादेवाची पिंड आहे आणी विशाल अशा काळ्या पत्थरातुन तीच्यावर जलाभिषेक होतो आहे.
हे दृश्य पाहीले की निसर्ग ही देवा पुढे कसा लिन होतो याची खात्री पटते.
येथ पर्यंतचा प्रवास काहीसा सोपा आहे पण येथुन पुढील कोरीव लेणी पर्यंत चा प्रवास अतंत्य खडतर आहे.
ज्यांची मनाची तयारी आहे.आणी ज्याच्या कडे धाडस आहे तोच हा प्रवास करू शकतो.
कारण येथुन पुढील चढण ही डोंगराच्या कड्याने चढायची आहे आपल्या पायाखाली फक्त एक फुटाची पायरी हाच काय तो एक मेव आधार बाकी चढण पालीसारखा दगडाला चिटकुन करावा लागतो.जर आपण मान वळवुन जरी मागे पाहीले की चार हजार फुटाची दरी दिसते जर का आपला पाय पायरी वरून निसटला तर कसलाच आधार नाही सरळ कडेलोटच झाला असे समजावे.याच प्रवासात फुटकी पायरी येते काही कारणास्तव येथील एक पायरी नाहीशी झाली आहे.
येथे आले की ब्रम्हांड आठवते कारण येथे पायरी तुटून गेल्या मुळे दोन्ही हाताची बोटे अडकविण्या साठी खडकात उखळी पाडलेली आहेत त्या उखळीत बोटे घालुन शरीराला पाच सहा फुट वर ढकलावे लागते.तेव्हाच वरच्या पायरी पर्यंत पोचता येते.अशा प्रकारे जिवाची बाजी लावुन आपण अखेर कोरीव लेण्या पर्यंत पोचतो.एकदा वर गेलो की मन अगदी प्रसन्न होते.
जागो जागी खोदलेले पाण्याचे हौद नजरेत भरतात.त्याच एका हौदातील थंडगार पाणी पिले की सगळा शिण नाहीसा होतो.
वरती साधू बाबाचा मठ कोरीव लेणी या मध्ये खोली आहे लहान से दुर्गेश्वराचे मंदीर आहे.येथुन निसर्गाचे दृश्य विलोभनीय दिसते.ही लेणी पहायचे धाडस केले यांचे समाधान वाटते.लेण्यांचे काम चालू असताना कोणते तरी तात्कालीन कारण असे घडले की काम करणाऱ्यांनी ते काम अर्धवट च सोडले.
गडद येथील सुभाष तळेकर म्हणाले,”
आपण कधी ही लेणी पहायला गेला तर वाटाड्या सोबत घ्या तोच आपल्याला वरती घेउन जावु शकतो.कोठे कसा पाय द्यायचा हाताचा आधार कसा घ्यायचा.अगदी डावा पाय पायरीवर टाकायचा की उजवा याची ही माहीती घ्यावी लागते कारण आपल्याला वळण्या येवढी ही जागा पायरीवर नाही.

error: Content is protected !!