वडगाव मावळ:
अभ्यासू आणि जिद्दी कार्यकर्त्यांची फौज उभी करून राष्ट्रहिताचा विचार करणारी पिढी निर्माण करा.तसेच राष्ट्रवादीच्या विविध सेल मधून मिळालेल्या व्यासपीठावरून सवःचे अस्तित्व सिद्ध करा असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
वडगाव मावळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात गारटकर बोलत होते. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर, जिल्हा नियोजनचे सदस्य विठ्ठलराव शिंदे,जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, महिला अध्यक्षा दिपाली गराडे, युवती अध्यक्षा आरती घारे, नगरसेवक सुनिल ढोरे,देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे, वडगाव शहर अध्यक्ष प्रविण ढोरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, औद्योगिक सेल अध्यक्ष नवनाथ हरपुडे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” राष्ट्रवादी विचाराची कास धरणारी कार्यकर्त्याची तरूण फळी मावळात काम करीत आहे.
राज खांडभोर यांनी प्रास्ताविक केले. च॔द्रजित वाघमारे यांनी सुत्रसंचालन केले. सचिन घोटकुले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!