टाकवे बुद्रुक:
भोयरे केंद्रात शाळा पूर्वतयारी कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला सर्व शाळांनी उस्फूर्तपणे भाग घेतला होता केंद्रातील सर्व शिक्षकांनी प्रत्येकाने एकशे बढकर एक तयारी केली होती सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
काही शाळांमध्ये तर पारंपरिक पद्धतीने बैलगाडी सजवून त्यामध्ये विद्यार्थ्यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक शालेय आवारात आल्यानंतर विद्यार्थ्यांना औक्षण करण्यात आले भोयरे शाळेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला .
केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कृष्णा भांगरे सर तसेच खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री केदार सर हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते भांगरे सरांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करण्यासाठी पालकांना आवाहन केले सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना बहुमोल मार्गदर्शन केले शाळा पूर्वतयारी वर्गाचे महत्व पालकांना पटवून दिले शाळेचे मुख्याध्यापक श्री विरणक सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामभाऊ भोईर कर उपाध्यक्ष करवंदे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गावचे पोलीस पाटील मंगेश आडिवळे तसेच पालक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सर्व दाखल पात्र विद्यार्थी उत्साहाने शाळेत उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्चना गाढवे मॅडम यांनी केले श्री विरणक सर यांनी सर्वांचे आभार मानले व तानाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
केंद्रातील इंगळून कशाळ कल्हाट कोंडीवडे किवळे पिचडवाडी परिठेवाडी कुणे व केंद्रातील सर्व शाळांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला .
श्री कृष्णा भांगरे सर व गंगाराम केदार सर यांनी भोयरे कशाळ परिठेवाडी पिचडवाडी इंगळून या शाळांना भेटी दिल्या व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांना मौलिक मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!