मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसची कार्यकारिणी जाहीर
मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी दिपाली गराडे यांची निवड
वडगाव मावळ :
आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील महिलांचे उत्कृष्ट संघटन निर्माण झालं आहे. पण ठराविक काळानंतर संघटनेच्या विविध पदांवर नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्याचा पक्षाचा प्रोटोकॉल आहे. आज पक्षाच्या विविध पदांवर नियुक्ती झालेल्या सर्व महिला पदाधिकार्यांचे अभिनंदन, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व पवार साहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करा.याकरिता पक्ष संघटनेसाठी वेळ दया.
आपल्याला अतिशय कार्यक्षम आमदार लाभलेले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहेत. यामुळे तालुक्यातील संघटन वाढविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. यासाठी आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके या आपल्याला नेहमीच सहकार्य करत आहेत. असे वक्तव्य पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा भारती शेवाळे यांनी वडगाव येथील महिला आढावा बैठकीत केले.
यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले की, राष्ट्रवादी महिला संघटना मावळ तालुक्यात अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. कोरोना काळात देखील महिला पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य केले. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील महिला संघटना टिकून ठेवून महिला संघटन वाढविण्याचे काम या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पुढील काळात देखील अशा प्रकारचे कार्य नवनिर्वाचित महिला पदाधिकारी करतील असा मला विश्वास आहे. यावेळी आमदार शेळके यांनी नवनियुक्त सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सोमवारी (दि.१८) वडगाव मावळ येथे पार पडलेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्यकारिणी आढावा बैठकीत पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा भारती शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुनिल शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, माजी तालुकाध्यक्ष बबन भेगडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू धनवे, मावळत्या महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, आदींच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या महिला कार्यकरीणी आढावा बैठकीत धामणे गावच्या सरपंच दिपाली गराडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ग्रामीण ब्लाॅक अध्यक्षपदी पुष्पा घोजगे, कार्याध्यक्ष पदी कल्याणी विजय काजळे, तळेगाव शहराध्यक्ष पदी शैलजा कैलास काळोखे, कार्याध्यक्ष पदी अर्चना दाभाडे, लोणावळा शहराध्यक्ष पदी उमा मेहता, कार्याध्यक्ष पदी संयोगीता साबळे, देहूरोड शहराध्यक्ष पदी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डच्या माजी उपाध्यक्षा अरुणा नंदकूमार पिंजण, कार्याध्यक्षपदी सविता जाधव, वडगाव शहराध्यक्ष पदी पद्मावती राजेश ढोरे, देहु शहराध्यक्ष पदी रेश्मा मयूर मोरे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच आंदर मावळ पूर्व विभाग अध्यक्षपदी उमा शेळके, पश्चिम विभाग अध्यक्षपदी शशिकला सातकर, मावळ तालुका युवती अध्यक्ष पदी आरती संतोष घारे, ओबीसी सेल अध्यक्षपदी संध्या थोरात, उपाध्यक्ष पदी विद्या मोहिते, आंदर मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदी सुप्रिया अनिल मालपोटे, तसेच सुजाता बाळासाहेब कारके, सविता बबूशा भांगरे, वैशाली गायकवाड, छाया गोणते, सुवर्णा घोलप, पुनम सातकर, अनिल दळवी, मंगल मुऱ्हे यांची उपाध्यक्ष पदी तर मनिषा दाभाडे, रेश्मा देवकर, सीमा भानुसघरे, वर्षा नवघणे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमा दरम्यान उर्से विकास सोसायटीचे संचालक शिवाजी धामणकर, सोपान वाळूंज, ग्रामपंचायत सदस्य जायसिंग ठाकूर, सुनिल धामणकर, पंकज तंतरपाळे व रवी पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात आमदार सुनिल शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष भारती शेवाळे यांच्या हस्ते प्रवेश केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा शेळके, विकास कंद यांनी तर आभार सुवर्णा राऊत यांनी मानले.

error: Content is protected !!