वडगाव मावळ:
ग्रामीण भागात बहुतांश स्मशानभूमीच्या ठिकाणी निवारा शेड नसल्यामुळे नागरिकांना तासन्तास उन्हात बसावे लागत आहे .
ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी स्मशानभूमीच्या बाजूला निवारा शेड नसल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास उन्हामध्ये बसावे लागत आहे.या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात यावे अशी मागणी टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गट भाजपाचे अध्यक्ष रोहीदास असवले यांनी केली
परिणामी ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी असे भयानक वास्तव आहे. तर काही ठिकाणी जागेच्या अडचणीमुळे स्मशानभूमी सुद्धा नाही, परिणामी त्या ठिकाणी अंत्यविधी उघड्यावरतीच करावा लागत आहे, तसेच निवारा शेड नसल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना वाढत्या उन्हाच्या प्रवाहाच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान या ठिकाणी काही नागरिक ठीक ठिकाणी झाडाच्या सावलीच्या आसऱ्याला बसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच ज्या ठिकाणी अंत्यविधी होतो त्या स्मशान भूमीत व बाजूला पडलेल्या सावलीचा आसरा घेताना बहुतांश महिला वर्ग त्या ठिकाणी दिसून येत आहे.
दरम्यान दशक्रिया विधीच्या वेळी सकाळी त्या ठिकाणी 8:00 च्या हभप. महाराजांचे प्रवचन सुरू होते, त्यावेळी उन्हाचा वाढता आलेख असतो.परिणामी खूप अधिक प्रमाणत ऊन वाढत असते यामध्ये प्रवचन करणाऱ्या महाराजांसह अनेक महिला व पुरुष उन्हामध्ये बसलेले असतात.
दरम्यान काकस्पर्श होण्यास उशीर झाल्यास प्रवचन 1 तासापासुन पुढे 2 तासांपर्यंत सुरू राहते.
त्यानंतर काही धार्मिक ठिकाणी त्या सबंधित कुटुंबाकडून देवस्थानांना देणगी दिली जाते त्यानंतर काही मान्यवरांकडून त्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्रद्धांजलीपर भाषण होतात या सर्व बाबीमध्ये कमीत कमी तीन तास जातात.
परिणामी नागरिकांना तीन ते साडेतीन तास उन्हामुळे ताटकळत बसावे लागते,तसेच याउलट पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट, एखाद्या झाडाचा आसरा घेऊन उभे राहावे लागते. दु :खात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दशक्रिया विधी कार्यक्रमास येताना अनेक नागरिक उपाशी पोटी सकाळी सकाळी त्या ठिकाणी पोहोचत असतात वाढत्या उन्हाच्या प्रवाहाच्या लहरींमुळे अनेक नागरिकांना भुरळ ( चक्कर ) येण्याचे प्रकार घडत आहे.
परिणामी अशा नागरिकांना नाईलाजास्तव हॉस्पिटल गाठावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता सदर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ज्या त्या ठिकाणी निवारा शेड करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी दुःखात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आहे.
या उपाययोजना होणे गरजेचे आहे.• ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन वरिष्ठ विभागाला ठराव पाठवून स्मशानभूमीच्या ठिकाणी निवारा शेड करणे गरजेचे आहे.
• ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी स्मशानभूमी करणे उभारणे गरजेचे आहे.
• काही ठिकाणी स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही त्या ठिकाणी नागरिकांनी रस्त्याची सुविधा होण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
• ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
• तसेच स्मशानभूमीच्या भागांमध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था होईल यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
हभप. तुषार महाराज दळवी म्हणाले,”
ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी असे वास्तव आहे ज्या ठिकाणी निवारा शेडच नाही, शेड नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्या ऊन पावसामध्ये भासत आहे. तरी त्या भागातील संबंधित लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या समस्या दूर कराव्यात.

error: Content is protected !!