शाळेचा चेहरामोहरा बदलला…पारिजात संस्था,मुंबईच्या वतीने एकदिवसीय इंद्रधनुषी रंगशाळा संपन्न
सोमाटणे:
मुंबई येथील पारिजात संस्थेच्या वतीने मळवंडी ढोरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकदिवसीय रंगशाळा संपन्न झाली.सुट्टीच्या दिवशी संस्थेतील लहान मोठ्या सभासदांनी दिवसभर शाळेतील चारही वर्गखोल्या व संरक्षक भिंतीला छानपैकी रंगरंगोटी करुन शाळेचे रुप पालटले.
पारिजात संस्था गेल्या काही वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक विविध उपक्रम राबवित आहे..महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शाळांमध्ये बॕक टू स्कूल,इंद्रधनुषी शाळा,वृक्षारोपण व संवर्धन इ.स्वरुपाची कामे संस्थेच्या मार्फत केली जातात.त्या उपक्रमांतर्गत विविध चित्रे काढून विविध सामाजिक संदेश देऊन शाळेचे संपूर्ण रंगरुप पालटले.तसेच शाळेच्या संरक्षक भिंतीवर विविध संदेशाच्या मार्फत जनजागृतीचे काम केले.
या उपक्रमामुळे ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थ्यां मध्ये आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण आहे.पारिजात संस्थेतील सर्व सभासदांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करुन आभार मानण्यात आले..पारिजात संस्थेचे प्रमुख अनुप साळगावकर, स्वप्नील पाथरे,गुरुदास बाटे,राहुल शिंदे
स्वप्निल शिंदे,गौरवी माळगावकर,चेतन पवार,अस्मिता देसाई,स्मिता जोशी,आनंद नरळे इ.च्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला.
सरपंच रंजना ढोरे,मा.उपसरपंच सुवर्णा ढोरे,अध्यक्ष सिताराम गायकवाड,गोरख ढोरे,पोपट ढोरे,निर्गुण जाधव,तानाजी ढोरे, मुख्याध्यापक राजू भेगडे,सोमलिंग रेवणशेट्टे,साधना बो-हाडे,पूजा राऊत इ.च्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!