सोमाटणे:
सोमाटणे येथील टोलनाका हटवावा या मागणी साठी सर्व पक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने जन आक्रोश अंदोलन छेडण्यात आले. या अंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे तील टोल नाका हटाव या मागणीसाठी नागरिकांनी लिंब फाटा येथे गर्दी केली.
सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावल्यानंतर साधारणपणे साडे अकराच्या सुमारास लिंब फाटा येथून टोल हटाव असा जनआक्रोश करीत निघालेल्या जथ्यांनी टोलनाक्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्व राजकिय पक्षांचे झेंडे,घेऊन जोशात निघालेल्या कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल केला.
टोलचा झोल दर्शविणा-या गाण्याच्या ध्वनीफितीतून वातावरण चांगले ढवळून निघाले होते. पोलिसांनी मोठा फौजफाटा गोळा केला होता. पोलीस आणि अंदोलनीकर्ते यांच्यात समन्वय साधत निघालेला मोर्चा लिंबफाट्या वरून पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून तळेगाव खिंडीतून सोमाटणेत पोहचला.
मोर्चाला पोलिसांनी तीन वेळा थांबून अंदोलन संपवावे अशी भूमिका प्रशासनाने मांडली. पोलिसाच्या भूमिकेचे स्वागत करीत अंदोलन टोलनाक्याच्या अलिकडे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले .यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी टोल नाका बंद करावा अशी मागणी करीत टोलच्या झोलचा पर्दाफाश केला.
तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा येऊन निघालेल्या जनआक्रोश मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”रणरणत्या उन्हात निघालेल्या मोर्चातील नागरिकांचा उत्साह वाखण्या सारखा होता. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ आवारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अंदोलनात राजकीय जोड बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सोमाटणे तील हा बेकायदेशीर टोल आहे.दोन टोल मधील अंतर २९ किलोमीटर टोल आहे.ही टोलधाड आम्ही गेली वीस वर्षे आपण सहन करतो. आता सहन करणारा नाही.मावळच्या जनतेची फसवणूक करणा-या टोल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
किशोर भाऊ आवारे यांनी हे अंदोलन छेडले. किशोर भाऊना सर्वानी साथ दिली. पोलिसाची भूमिका सकारात्मक आहे.आमची मागणी साधी,सोपी आणि सुटसुटीत आहे.टोल हटवा,मावळ वाचवा.
शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे,मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,संतोष कदम,भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, काँग्रेसचे नेते यादवेंद्र खळदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणातून खडे बोल सुनावले. माजी नगराध्यक्ष सुलोचना आवारे,नगरसेवक किशोर भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे ,नगरसेवक गणेश काकडे,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,राजू जांभूळकर, समीर खांडगे,विजय काळोखे यांच्यासह नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!