शिक्षक समाजाची धडाडती तोफ म्हणजे धो. य. खांडभोर गुरुजी
मावळमित्र न्यूज विशेष:
महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा एकमेव नेता, कै . धो.य. खांडभोर गुरुजी म्हणजे आम्हा शिक्षकांचे पंचप्राण होते. मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील अथवा महाराष्ट्रातील कोणत्याही शिक्षकांवर अन्याय झाला तर, सर्वांना पहिले आठवायचे ते आमचे अण्णा खांडभोर गुरुजींना शैक्षणिक, सामाजिक, कृषी ,कला, क्रीडा, व राजकीय वारसा लाभला होता. नव्हे तो त्यांनी शून्यातून निर्माण केला होता.
सामाजिक जीवनात काम करत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना अण्णांनी मोलाची मदत केली. मार्च 1998 ला मी इयत्ता: बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी डी. एड.ला फॉर्म भरला. माझा प्रवेश राजगड ज्ञानपीठ भोर तालुका: भोर जिल्हा: पुणे* येथे निश्चित झाला. मी जेमतेम पंधरा दिवस सदर डीएड कॉलेजला राहिलो असेल. भात लावणीचे दिवस होते. मी मौजे: कुसुर तालुका: मावळ जिल्हा: पुणे या माझ्या मूळ गावी भात लावणीच्या वेळेस आलो. मला भोर कॉलेजला करमेनासे झाले. मग माझ्या मनात विचार आला, माझ्या मावळ तालुक्यात हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेज असून मला एवढ्या लांब पर तालुक्यात जावे लागले, याची सारखी खंत मनाला वाटू लागली. मी शिक्षण सोडून द्यायचे ठरवले.त्यावेळेस माझ्या वडिलांनी अशिक्षित शेतकरी असून सुद्धा मला *शब्द दिला, तू शिक्षण थांबवू नकोस. माझे मित्र खांडभोर गुरुजी हे नक्कीच तुला मदत करतील.
*माझ्या वडिलांनी असा शब्द दिल्यावर मी आनंदित झालो. कारण खांडभोर गुरुजी हे खूप मोठे प्रस्थ आहे; हे मी ऐकुन होतो. माझ्या वडिलांचे मावसभाऊ किसन नाना गवारी आणि माझे वडील शिवराम मोरमारे हे दोघे मावस भाऊ त्यांचे मित्र खांडभोर गुरुजी यांच्याकडे गेले .आणि त्यांनी माझी कॉलेजची परिस्थिती सांगितली.
त्यावेळेस माझ्या वडिलांना खांडभोर गुरुजींनी शब्द दिला. दादा पंधरा दिवसात तुझ्या मुलाला बाफना डी .एड .कॉलेज ला आणणार म्हणजे आणणारच. आणि अण्णांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला मला पंधरा दिवसात ट्रान्सफर करून बाफना डी .एड. कॉलेज मिळवून दिले.
अण्णांनी माझ्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्याला शिक्षण सोडण्यापासून वाचवलं होतं. अण्णांनी हे जर माझ्यासाठी केलं नसतं, तर आज माझ्या हातामध्ये नांगर आणि शेतातील माती उकरणे व मोल मजुरी करण्याशिवाय पर्याय नसता. अण्णांनी मला माझ्या मावळ तालुक्यातील बाफना डी.एड. कॉलेज मिळवून दिल्याने आमच्या घरात आणि नातेवाईकांमध्ये* *आनंदाला पारावारा उरला नव्हता. कारण 1993 ला मी इयत्ता: आठवी मध्ये शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वडेश्वर येथे माध्यमिकचे शिक्षण घेत असताना बाफना डी .एड. कॉलेजचा पाच दिवसाचा कॅम्प आमच्या शाळेत आला होता. त्यावेळेच्या बाफना डी .एड. कॉलेजच्या छात्र अध्यापकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कला, क्रीडा गुण पाहून मलाही वाटलं आपणही डी.एड. कॉलेजला गेलो* *पाहिजे, आणि शिक्षक झालो पाहिजे. मी इयत्ता आठवीत असताना पाहिलेले हे स्वप्न, श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ बाफना डी.एड. कॉलेजच्या सचिव पदावर असणाऱ्या* *आमच्या लाडक्या अण्णांनी पूर्ण केले.
मी जुलै 2000 ला डी.एड .उत्तीर्ण झाल्यावर सुशिक्षित बेकार म्हणून फिरू लागलो.50 रू. रोजंदारीवर कामाला जाऊ लागलो. हे अण्णांना समजल्यावर ,अण्णांनी मला श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाची इयत्ता: पहिली ते चौथी डी.एड. कॉलेज च्या इमारतीमध्ये असणाऱ्या शाळेत 1200 रु. प्रति महिना पगारावर शिक्षकाची पहिली नोकरी मिळवून दिली. अण्णांनी माझा भाकरीचा प्रश्न सोडवला. नंतर ही नोकरी करता करता मी पेपरला आलेल्या जाहिराती नुसार* *फॉर्म भरला*. *आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्गुसन कॉलेज पुणे येथे मुलाखत दिली. तेथे माझी शिक्षण सेवक पदावर निवड झाली. आणि मला सदर संस्थेच्या अख्यातरीत असलेली पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स हायस्कूल येथे नियुक्ती मिळाली. येथे जमते मे सात महिने नोकरी केल्यावर मला जिल्हा परिषद पुणे येथून शिक्षण सेवक पदासाठी कॉल लेटर आले.
हे लेटर घेऊन मी शिक्षक समाजाचा बुलंद आवाज आमचे(अण्णा) खांडभोर गुरुजी यांच्याकडे गेलो. अण्णांना हे लेटर दाखवले अण्णा काय करू? मी पिंपरी चिंचवड येथे शिक्षण सेवक पदावर आहे.आणि आता आपल्या जिल्हा परिषद पुण्याचे कॉल लेटर आले आहे. अण्णांनी क्षणात सांगितले तिकडचा तात्काळ राजीनामा देऊन ,जिल्हा परिषद पुणे येथे रुजू हो. मी पण क्षणाचा विलंब न लावता अण्णांचा सल्ला ऐकून तात्काळ पिंपरी येथील अनुदानित शाळेचा राजीनामा दिला, आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माळेगाव खुर्द तालुका: मावळ जिल्हा: पुणे येथील प्राथमिक शाळेत
*04- 12- 2001 रोजी रुजू* *झालो. त्यावेळेस आण्णा पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक* *संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक* *शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष होते. नोकरीला लागल्याबरोबर अण्णांच्या संघटनेचा मी आजीव सभासद झालो. संघटनेच्या होणाऱ्या* *मिटींगला मी जाऊ लागलो. अण्णांचं वक्तृत्व, नेतृत्व, आणि संघटन पाहून भारावून गेलो, मलाही वाटू लागलं आपणही शिक्षक बंधू-भगिनींसाठी साठी*, *त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढाव. त्यावेळेस खांडभोर गुरुजींच्या पुढे बोलण्याची आणि भर मीटिंगमध्ये प्रश्न मांडण्याचे धाडस कोणी सहसा करू शकत नव्हतं.* *परंतु 1998 सालापासून मी अण्णांच्या जवळ असल्याने, आणि अण्णांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून अण्णांना कार्यकर्ता ओळखण्याचे पारख व दूरदृष्टी असल्याने अण्णांनी मला मावळ तालुका* *प्राथमिक शिक्षक संघाचा उपाध्यक्ष केले. त्यावेळेस तालुका संघाची जम्बो कार्यकारणी ही एका बोर्डवर लिहिलेली असायची त्यामध्ये नाव येणं, हे* *शिक्षकांना खूप अप्रूप वाटायचे. त्यावेळेस अण्णांनी मला उपाध्यक्ष केले म्हणून, आमचे सीनियर शिक्षक बांधव थोडे नाराज झाले. की एवढ्या लहान* *वयातील शिक्षण सेवकाला अण्णांनी लगेच सेवेत आल्याबरोबर उपाध्यक्ष कसे केले?* *त्यावेळेस आण्णा म्हणायचे आमचा गेनभाऊ धडाडीचा कार्यकर्ता आहे. तो एक ना एक दिवस या तालुका संघाचा अध्यक्ष होईल. आमच्या अण्णांकडे दूरदृष्टी होती, त्यांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली*. *आणि मी 1 सप्टेंबर 2019 रोजी मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा अध्यक्ष झालो. ज्या तालुका संघाचे अध्यक्षपद धो. य. खांडभोर गुरुजींनी भूषवले होते . त्या तालुका संघाचा मी अध्यक्ष झालो हे* *अण्णांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले होते .परंतु हे पाहण्यासाठी आमचे अण्णा नाहीत ,याची खंत मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील*.
*अण्णांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी रेनॉल्ट डस्टर नावाची फोर व्हीलर घेतली. हे ऐकून आमच्या अण्णांना माझा अभिमान वाटला .अण्णा ज्या ज्या शिक्षकांना भेटतील त्या त्या वेळेस म्हणायचे, आमचा गेणभाऊ खूप मोठा माणूस झाला. हे ऐकून मलाही अत्यानंद व्हायचा. मी हे करू शकलो आमच्या (अण्णा)मुळे. माझ्यासारख्या अनेक गोरगरीब महाराष्ट्रातील कित्येक विद्यार्थ्यांना अण्णांनी बाफना डी .एड.* *कॉलेजला प्रवेश देवून त्यांना सर्व प्रकारची मदत करून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिकवण्यासाठी अनेक अध्यापक तयार केले. मी जिल्हा परिषद केंद्र शाळा माळेगाव खुर्द येथे कार्यरत असताना 2001 ला* *अण्णांनी मला नवीन वस्ती शाळा तयार करण्याचा प्रस्ताव ,तयार करायला सांगितले.तुझ्या वाडीतील मुलांना एक किलोमीटर लांब जावं लागत आहे. हे विद्यार्थ्यांचे हाल थांबले* पाहिजेत. *मोरमारेवाडी (कुसुर )येथे आपण वस्ती शाळा काढून एखाद्या बारावी पास असणाऱ्या गोरगरिबाच्या पोराचा नोकरीचा प्रश्न सुटेल .आणि विद्यार्थ्यांचेही कल्याण होईल.*
*या चांगल्या हेतूने अण्णांनी मोरमारेवाडी (कूसुर)तालुका: मावळ जिल्हा: पुणे येथे वस्ती शाळा ओपन करायला लावली. अण्णांच्या नेतृत्वाखाली अण्णांनी आणि मी सुरू केलेल्या वस्ती* *शाळेत आमचा राजू वाडेकर हा वस्तीशाळा शिक्षक म्हणून रुजू झाला. येथेही गुरुजीं मुळेच एका गोरगरीब मुलाचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता. मी 2011 रोजी गुरुजींनी सुरू केलेल्या वस्ती शाळेत रुजू झालो* .*आणि सलग सात वर्षे सेवा माझ्या मूळ गावी केली*.
*शिक्षक संघाची धडाडती तोफ धो.य. खांडभोर*

*गुरुजी यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आम्ही जे जे केले, त्यामध्ये आम्हाला यश मिळत गेले*.
*2001 ला महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण सेवक भरती झाली, त्यामधील सर्वात मोठी बॅच आमची होती.2003 ला मावळ तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेत पतसंस्थेची आमसभा झाली ,आम सभेत मी स्वतः उठून* *शिक्षणसेवकांना पतसंस्थेचे सभासद करून घ्या ,म्हणून मागणी केली. त्यावेळी चेअरमन खांडभोर गुरुजी होते .इतर संचालकांनी विरोध केला, कुणालाच वाटत नव्हते की, या शिक्षण सेवकांना सभासद करून घ्यावे म्हणून. कारण शिक्षणसेवकांना भविष्यात पूर्ण पगार मिळेल की नाही याची कोणालाच खात्री* *नव्हती .परंतु आमचे अण्णा शिक्षकांचा कैवारी , गरिबीची जाण असणारा नेता, गुरुजींनी सर्व संचालक मंडळ व आमसभेला संबोधित करताना सांगितलं आमचा* *गेनभाऊ म्हणतोय ना, आम्हाला सभासद करा. आम्हाला महाराष्ट्र शासन नक्कीच पूर्ण पगारावर शिक्षक म्हणून घेईन; अण्णांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून 2003 ला शिक्षण सेवकांना पतसंस्थेत सभासद करून घेतले.*
*एवढा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्यावर ठेवणारा नेता ,माझ्या जीवनात मी पहिल्यांदा पाहिला. स्वतःच्या हिम्मतीवर संचालक मंडळाचा रोष पत्कारून शिक्षण सेवकांना पतसंस्थेचे सभासद करून घेतले. आणि आम्हा* *सर्वसामान्य शिक्षण सेवकांना अण्णांनी प्रथमता 10,000 हजार रुपये कर्ज मंजूर करून दिले. नंतर दुसऱ्या वर्षी आमसभेला मी 25000 रू कर्ज शिक्षण सेवकांना मिळावे अशी* *मागणी केली. अण्णांनी तीही तात्काळ मंजूर करून* *टाकली. म्हणून त्या काळात आमच्या सारख्या अनेक गोरगरीब शिक्षण सेवकांची लग्न जमू लागली, आणि अनेकांच्या प्रपंचाला आर्थिक हातभार अण्णांच्या* *धडाडीच्या निर्णयामुळे लागला.*
*अण्णा उत्तम कबड्डीपटू होते. हे आम्ही ऐकून होतो. आपणही त्यांच्यासारखंच व्हावे असे आम्हाला शालेय जीवनापासून वाटायचे.*
*2003 ला पंचायत समितीचे सभापती शिक्षक मित्र श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी पंचायत समितीच्या प्रांगणात मावळ* *तालुक्यातील 24 केंद्रातील शिक्षकांच्या कबड्डीच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यावेळेस मी माळेगाव केंद्राचे नेतृत्व करत होतो. त्यावेळेस आण्णांचा आशीर्वाद घेऊन, कबड्डी मध्ये मावळ* *तालुक्यात प्रथम क्रमांक आमच्या केंद्राने पटकावला होता. त्यावेळेस आण्णांनी कौतुकाने माझी पाठ थोपटली होती. अण्णा म्हणजे एक ऊर्जा होते. अण्णांना पाहिल्यावर वेगळेच स्फुरण चढायचे. अण्णांनी मला एकदा पुणे जिल्हा* *प्राथमिक शिक्षक संघ संचलित शरद अध्यापक विद्यालय येथे लोकलने नेले होते .त्यावेळेस आण्णा मला म्हणाले, गेनभाऊ ही संघटना एक दिवस तुम्हाला चालवायची आहे. हे सगळे माहिती करून घ्या. फार मोठी दूरदृष्टी आमच्या अण्णांकडे होती.
नागाथली गावचं ग्रामदैवत श्री .म्हसोबा यांच्या आशीर्वादाने हा ग्रामीण भागातील सह्याद्रीचा ढाण्या वाघ महाराष्ट्राच्या* *कानाकोपऱ्यात पर्यंत पोहोचला होता. गुरुजींचे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षक आसुसलेला असायचा. खांडभोर गुरुजी भाषण करायला उठले की, भाषण करायच्या अगोदरचटाळ्यांचा कडकडाट व्हायचा. एवढं त्यांचं अमोघ , दर्जेदार आणि काळजाला भिडणारे शब्द, दर्जेदार वक्तृत्व ,लोकांना ऐकावं वाटायचं. मावळ तालुक्यातील खांड विविध कार्यकारी सोसायटी, दूध सोसायटी, शिक्षक पतसंस्था, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघ अशा विविध संस्था व संघटनेत काम करताना अण्णांनी सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ठसा उमटेल असा कारभार करून दाखवला.
अण्णा आम्हा शिक्षकांचा अभिमान, बुलंद आवाज, धडाडती तोफ , दूरदृष्टी असलेला नेता,गोरगरिबांचे कैवारी होते. अण्णा तुम्हीअजून असते तर , संघाच्या कार्यकर्त्यांच्या अंगात अजून दहा हत्तींचे बळ नक्कीच आले असते. अण्णा तुम्ही आखून दिलेल्या मार्गावर भविष्यातही आम्ही वाटचाल करून यशस्वी होऊ.
आमचा शिक्षकांचा बुलंद आवाज आमचे अण्णा कै. धो.य. खांडभोर गुरुजी यांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
(शब्दांकन- गेनू शिवराम मोरमारे ,अध्यक्ष- मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघ)

error: Content is protected !!