
वडगाव मावळ:
वडगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अतुल वायकर यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांनी त्यांची निवड केली.
आमदार सुनिल शेळके,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,नगराध्यक्ष मयूर ढोरे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,वडगाव शहराध्यक्ष प्रविण ढोरे यांच्या उपस्थितीत वायकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
अतुल वायकर मावळ तालुक्यातील यशस्वी उद्योजक असून हाॅटेल शिवराज हा बॅण्ड त्यांनी महाराष्ट्रभर पसरवला आहे. शिवराज ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम वायकर यांनी राबविले आहे.
कोरोना काळातील केलेल्या त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित युवक अध्यक्ष अतुल वायकर म्हणाले,” राष्ट्रवादी पक्षाचे विचार पोहचवून पक्ष संघटना वाढीसाठी परिश्रम घेऊन घेतले जातील.
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सभासदांचे स्नेहसंमेलन उत्साहात
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप



