पवनानगर परिसरामध्ये विवध कार्यक्रमांनी रामजन्मोत्सव उत्साहात साजरा,परिसरातील नागरिकांचा दर्शनासाठी मोठा प्रतिसाद.
पवनानगर:
पवनानगर परिसरामध्ये विवध कार्यक्रमांनी रामजन्मोत्सव उत्साहात साजरा,परिसरातील नागरिकांचा दर्शनासाठी मोठा प्रतिसाद पहायला मिळाला.
महागाव येथील प्रभाचीवाडी रामजन्मत्सोवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या गावातील स्पाताहाला २३ वर्षाची पंरपरा असुन ७ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये दररोज काकडा आरती,गाथा भजन,प्रवचन, किर्तन,हरिपाठ,महाप्रसाद या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १० ते १२ पर्यत ह भ प तुषार महाराज दळवी यांचे श्रीराम जन्माचे सुश्राव्य किर्तन झाले.
यावेळी महागाव, पवनानगर, काले,कडधे, ब्राम्हणोली, कोथुर्णे, आंबेगाव, ठाकुरसाई या परिसरातील महिला,नागरिक,लहान मुले,वृध्द नागरिकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेवक किशोर भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर निकम, सरपंच सोपान सावंत, गणेश सावंत, काशिनाथ डोंगरे, लाला गोणते,माऊली आढाव,संजय मोहोळ,साईनाथ गायकवाड यांच्या सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच प्रभाचीवाडी येथे दर्शनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.

error: Content is protected !!