वडगाव मावळ:
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.आता पर्यत आपल्या चांडाळ चौकटीने
देशाचे जेष्ठ नेते,आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. पवार यांच्या निवासस्थानावर भ्याड हल्ला केला. यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देऊ. मावळ तालुक्यातून आपणाला मुंबईला जायचे,यापुढे आपल्या पिलावळीने असे कृत्य केल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपणांस रस्त्यावरून फिरकू देणार नाही,असा घणाघात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोटोबा महाराज मंदीर ते तहसीलदार कार्यालय असा निषेध मोर्चा काढला होता. यावेळी पंचायत समिती चौकात झालेल्या निषेध सभेत शेळके यांनी तोफ डागली. फडणवीस यांच्या पुतळ्याचे भरचौकात दहन करण्यात आले. पोटोबा महाराज मंदिरा पासून निघालेल्या निषेध मोर्चात कार्यकर्त्यांनी पवार यांचे समर्थन करणा-या घोषणा दिल्या.
यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे,माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, नगराध्यक्ष मयूर ढोरे,नगरसेवक किशोर भेगडे,तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे,युवक अध्यक्ष किशोर सातकर,महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत,वडगाव शहर अध्यक्ष प्रविण ढोरे, देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे,देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,सोशल मीडियाचे अध्यक्ष संजय शेडगे,सेवादलाचे अध्यक्ष जालिंदर शेटे,ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष विष्णू शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश चौधरी,शिक्षण मंडळाचे माजी सभापती
यांच्यासह शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांचा तीव्र निषेध केला. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सदावर्ते यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.अशाप्रकारे हिंसेला प्रवृत्त करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणार्‍यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करून समाज विघातक कृत्य करणा-या भ्याड शक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”
लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एसटी बस कामगारांच्या अंदोलनात कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे. सामंजस्य पणाने या संपातून तोडगा निघावा या साठी महाविकास आघाडी सरकार नेहमीच प्रयत्नशील होते. एसटी कामगारांनी या अनुषंगाने न्यायालयीन लढाई दिली आहे.
खांडगे पुढे म्हणाले,” न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकार योग्य दिशेने पुढे जात आहे.लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सदैव जनसेवेचा वसा घेऊन काम करीत आहेत.अनेक समस्यांवर त्यांनी कायमच तोडगा काढून सर्व स्तरातील जनतेला त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. शुक्रवारी दि.८.४.२०२२ ला त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. समाजकंटकांनी केलेला हा हल्ला घृणास्पद आहे.
अशा प्रकारे होणारे भ्याड हल्ले संस्कृत महाराष्ट्राच्या इतिहासात काळिंबा फासणारे आहे. या हल्ल्याच्या मागे असणा-या ख-या सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्या कारवाई करण्यात यावी.असे सांगून खांडगे म्हणाले,”
आमच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे या भ्याड हल्ल्याला सामोरे जाऊन त्यांनी चर्चा करावी असे आवाहन करीत होत्या. महाराष्ट्रातील राजकारणाचा सुप्रिया ताईचा हा संस्कृत पणा आमचे भूषण आहे.
यापुढे पवार साहेब किवा दादा,सुप्रिया ताई यांच्या विरोधात असे कृत्य केले,तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुसंस्कृतपणा विसरतील.

error: Content is protected !!