टाकवे ग्रामपंचायतीकडुन ५% अपंग निधीचे वाटप
टाकवे बुद्रुक :
टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने २०२१-२२ या वर्षाचा ५% अपंग निधीच्या धनादेशाचे वाटप नुकतेच करण्यात आले एकुण ४२ लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी दिंडी समाज मावळ तालुका अध्यक्ष तुकाराम गायकवाड, संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दत्तात्रय असवले नवलाख उब्रे ग्रामपंचायत सरपंच सविता बधाले याचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रम प्रसंगी सरपंच भुषण असवले,आंदर मावळ अध्यक्ष मारुती असवले,नवनाथ पडवळ, अनिल मालपोटे,माजी उपसरपंच सतु दगडे, सदस्य सोमनाथ असवले,माजी सरपंच जिजाबाई गायकवाड, सदस्या सुवर्णा असवले,ज्योती आंबेकर,प्रिया मालपोटे, ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर, पो.पाटील अतुल असवले,चिंदु घोजगे,राजु शिदे, नदु असवले, महादु गुणाट नवनाथ आंबेकर, बाळासाहेब कोकाटे, काळुराम घोजगे,दत्ता असवले, सदाशिव गायकवाड आदीजण उपस्थितीत होते.

error: Content is protected !!