टाकवे बुद्रुक:
येथे बैलगाडा शौकीनांच्या आवडीचा आणि हौसेचा खेळ असलेल्या घाटाचे भूमीपूजन सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राचे कुलदैवत ‘खंडोबा रायांच्या नावाने असलेल्या खंडोबा घाटाच्या भूमीपूजन प्रसंगी बैलगाडा शौकीन उपस्थित होते.
सरपंच भूषण असवले,उपसरपंच परशुराम मालपोटे,नंदूशेठ असवले,राम गुणाट,शिवाजी जांभूळकर,नवनाथ आंबेकर,संतोष पिंगळे,पांडुरंग असवले,सुनिल आंबेकर उपस्थित होते.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” बैलगाडा शर्यत शेतकरी बांधवांच्या उत्साहाची स्पर्धा आहे. पिढयान पिढया पासून चालत आलेल्या शर्यतीला बळीराजांनी जपल्या आहे. यासाठी त्यांनी पदरमोड केली आणि खस्ता खाल्ल्या आहेत. टाकवे बुद्रुकचा हा घाट बैलगाडा शौकिनांना साठी आपलसा वाटेल.

error: Content is protected !!