
नाणे टाकवे बुद्रुक वडेश्वरला विविध दाखल्यांचे घरपोच वाटप
वडगाव मावळ :
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील गावांमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमात ज्या नागरिकांनी जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरून दिले होते. त्यांना गुरुवारी (दि.३१) आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी घरपोच व कामाच्या ठिकाणी जाऊन जातीचे दाखले दिले.
ग्रामीण भागातील नागरीकांना सर्व शासकीय योजना व आवश्यक दाखले गावातच उपलब्ध व्हावेत यासाठी आमदार शेळके यांनी काही दिवसांपूर्वी शासन आपल्या दारी हा उपक्रम गावोगावी राबविला होता. या उपक्रमात नाणे, टाकवे बु. व वडेश्वर येथील ८० नागरिकांनी विविध जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरून दिले होते.
आमदार शेळके यांचे सहकारी नबीलाल आत्तार, रुपेश सोनुने, सोमनाथ आंद्रे, शेखर कटके यांनी गुरुवारी नागरिकांच्या घरी व कामासाठी बाहेर गेलेल्या नागरिकांना शेताच्या बांधावर आणि वीटभट्टीवर जाऊन ८० जातीच्या दाखल्यांचे वाटप केले आहे. यावेळी सरपंच छाया रविंद्र हेमाडे, उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप,रवींद्र हेमाडे, अंकुश हेमाडे ,श्रीराम हेमाडे, महादू कशाळे लहू मोरमारे ,उल्हास करवंदे विष्णू गवारी ,वासुदेव तनपुरे ,उषा हेमाडे उपस्थित होते.
घरपोच जातीचे दाखले उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभार्थ्यांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत.
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सभासदांचे स्नेहसंमेलन उत्साहात
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप



