वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक बांधणीचे काम प्रगतीपथावर असून पक्ष संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दि.३१ मार्च पर्यत अर्ज द्यावेत असे आवाहन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खांडगे म्हणाले,”
आपण सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील आणि आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शना खाली पक्ष संघटना बांधणीचे काम करीत आहोत.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारणी गठीत केली जाणार आहे.धर्मनिरपेक्ष विचाराची ही मुहूर्तमेढ अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे संघटनात्मक काम आपल्या सर्वाना मिळून करायचे आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी गठीत केली जात आहे. आपण सर्व कार्यकर्ते पक्ष संघटनेसाठी काम करीत आहात.पक्ष संघटनेची नूतन कार्यकारिणी लवकर जाहीर करणार आहोत.
रविवार दि. २० मार्च रोजी वडगाव मावळ येथे झालेल्या मेळाव्यात नूतन कार्यकारणी गठीत करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार पक्ष संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहे. पक्ष संघटनेत सक्रिय राहून काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज गुरूवार दिनांक ३१.३.२०२२ ला गेस्ट हाऊस येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत द्यावेत.अर्ज स्वीकारण्याची ३१ मार्च अंतिम तारीख आहे.

error: Content is protected !!