नवलाखउंब्रे:
वारंवार खंडित होणा-या वीज पुरवठयामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. आणि वीजपुरवठा खंडित झाल्यावर प्रशासकीय कामात अडथळा येतोच. त्यावर उपाय म्हणून तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्याला इन्व्हर्टर भेट देण्यात आला.
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बळीराम मराठे यांच्या पुढाकारातून इन्व्हर्टर देण्यात आला. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते इन्व्हर्टर प्रदान करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक रणजित सावंत ,मावळ तालुका राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष जालिंदर शेटे,ह.भ.प.भरत महाराज काळे,माजी उपसरपंच सोपान नरवडे, तन्मय मराठे,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे, केशव कुल, सचिन काचोळे व काजल आगाऊ उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” जिथे गरज असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मदतीला धावून जात आहे. बळीराम मराठे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील सक्रीय कार्यकर्ते आहे. त्यांनी केलेल्या मदतीचे अनुकरण इतर कार्यकर्त्यांनी करून शाळा,महाविद्यालय,आरोग्य केंद्र,पोलीस ठाणे,वृद्धाश्रम,अनाथाश्रमाच्या मदतीला पुढे यावे.

error: Content is protected !!