वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे प्रमुख पदाधिकारी व तालुका कृषी विभागाच्या अधिका-यांची बैठक वडगाव मावळ येथे झाले. किसान सेलच्या सुचनांचा कृषी विभागाने कामात अवलंब करावा असे एकमत या बैठकीत झाले.
शेतकरी बांधवांना लाभाच्या योजना देताना शेवटच्या घटकांपर्यंत या योजना पोहचण्यासाठी किसान सेल अग्रेसर राहील असा विश्वास किसान सेलचे अध्यक्ष दिगंबर आगिवले यांनी दिला.
मावळ तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”मावळात कृषी पर्यटनाला व शेती पुरक व्यवसायाला मोठा वाव आहे. याच अनुषंगाने ‘कृषी पर्यटन विकास ‘ प्रशिक्षण घेण्यात यावे. या कार्यशाळेत जास्तीत शेतक-यांना सहभागी करून ज्या मुळे या व्यवसायाला गती मिळेल.
राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष दिगंबर आगिवले,तालुका कृषी अधिकारी दतात्रय पडवळ,कृषी सहाय्यक राजाराम गायकवाड,तानाजी जाधव,मारुती करवंदे,सरपंच नामदेव गोंटे,शोभीनाथ भोईर यांच्यासह सेलचे अन्य पदाधिकारी व कृषी अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!