शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन काम करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची शिकवण
टाकवे बुद्रुक:
शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन काम करा,ही शिकवण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ही शिकवण घेऊन राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत जाऊन काम करीत ही अभिमानाची बाब आहे, यापुढे भविष्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सर्व आघाड्यांवर पुढे उभा राहून काम करेल असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
गणेश खांडगे यांनी दिला.
माजीमंत्री मदन बाफना,युवा नेते पार्थ पवार,राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचेञ उपाध्यक्ष माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड यांच्या पुढाकारातून भोयरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना वही वाटप करण्यात आले. यावेळी खांडगे बोलत होते.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर, सरपंच बळीराम भोईरकर, केंद्रप्रमुख सुनिल माकर,मुख्याध्यापक रामचंद्र विरणक,तानाजी खडके, नवनाथ आंबेकर, योगेश मोढवे,देविदास आडिवळे, मंगेश जाधव,अक्षय आडिवळे, वैभव पिंगळे, राजाराम करवंदे उपस्थित होते. तानाजी शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!