बेंदेवाडीत श्री महागणपती, श्री राम ,लक्ष्मण ,सिता व श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
टाकवे बुद्रुक:
बेंदेवाडी (डाहुली), ता. मावळ येथे श्री. महागणपती, श्री. राम, लक्ष्मण ,सिता व श्री.हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निती चैत्र शु ४ शके १९४४ मंगळवार दि. ५/४/२०२२ ते मिती चैत्र शु. ६ शके १९४४ गुरुवार दि. ७/४/२०२२ रोजी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.
सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ उपस्थित राहून सोहळ्यातील कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. मंगळवार दि. ५/४/२०२२ रोजी सकाळी ९ ते १२ वा. श्रींच्या मुर्तीची ग्रामप्रदक्षिणा व कलशयात्रा मिरवणूक तद्नंतर प्राणप्रतिष्ठा धार्मिक विधी होतील. श्री संजयशास्त्री उपासनी व ब्रम्हवृंदाद्वारे या विधीचे पौरोहित्य करणार आहे. सामुदायीक हरिजागर होईल.ह. भ. प. विकास महाराज खांडभीर (नागाथली) यांचे प्रवचन होईल. मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, होमहवन व कलशा रोहनप.पू.बालयोगी गणेशनाथजी महाराज
(गुरु गोरक्षनाथ मठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मठाधिपती श्री क्षेत्र भिमाशंकर) यांचे शुभहस्ते होईल.
ह. भ. प. रामायणाचार्य मधुकर महाराज वीर(श्री क्षेत्र साँदे सोलापूर) यांचे हरिकिर्तन होणार आहे.आमदार शेळके, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, माजीमंत्री संजय (बाळा भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,सरपंच नामदेव शेलार यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जय हनुमान तरुण मंडळ, बेंदेवाडी बाळ भैरवनाथ तरुण मंडळ, डाहुली सर्व महिला बचत गट, डाहुली बेंदेवाडी
समस्त ग्रामस्थ मंडळी, बेंदेवाडी, लालवाडी, लोहटवाडी, सोपावस्ती, डाहली. देवस्थान समितीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे.

error: Content is protected !!