टाकवे येथे धर्मवीर बलिदान मास दिन
टाकवे बुद्रुक:
छत्रपती श्री शिवरायांनी देव,देश, धर्मासाठी कसे जगायचे हे शिकवले तर धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजांनी आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या धर्मासाठी कसे मरायचे हे आपल्या ह्रदयद्रावक बलिदानातून शिकवले.उगवत्या हिंदु तरुण पिढीने संभाजी महाराजांचे हे बलिदान सदैव आपल्या चित्तात धगधगत ठेवले पाहिजे या हेतूने टाकवे येथील युवक आणि याचसाठी संपुर्ण फाल्गुन महिना हा धर्मवीर बलिदान मास म्हणुन पाळला जातो,
धर्मवीर छ. श्री संभाजी महाराजांनी एक महिना अनंत क्रुर, जुलमी, अमानवी अत्याचार सहन केले पण, देव,देश,धर्मासाठी स्वत्व-स्वाभिमान सोडला नाही. ते माघार,शरण,हताश,उदास झाले नाहीत. झुकले नाहीत, नमले नाहीत. दररोज एक एक अवयव शरीरापासुन वेगळा होत होता. त्या यमालाही भयभीत करेल अशा यातना राजांनी सहन केल्या पण हिंदवी स्वराज्य, स्वराज्य खजिना औरंगजेबाच्या घशात पडू दिला नाही.
संभाजी महाराजांच हे बलिदान जगाच्या पाठीवरती “तयासी तुलना कैसी…! सूर्यानेसुद्धा अचंबित व्हावे इतकं क्रूर,तेजस्वी,दैदिप्यमान बलिदान कुणासाठी ?
आपला देश, आपली धरती, माती, संस्कृती, परंपरा, सत्व, स्वाभिमान, हिंदवी स्वराज्य, हिंदू धर्म यांच्या रक्षणासाठी !!
या बलिदानाला तोड नाही, जोड नाही तुलना नाही, कोणीही उपमा देऊ शकत नाही. तोच श्रीशिवाजी-श्रीसंभाजी मार्ग हिंदूंच्या चित्तात, अंत:करणात, बुद्धीत, हृदयात, लहान-मोठ्या मेंदूत, रक्ताच्या थेंबा थेंबात भिनवने हे क्रमांक एक चे राष्ट्राच्या उत्थानाचे, धर्माच्या रक्षणाचे, भारतमातेच्या पुनर्संथापनेचं विलक्षण काम आहे. ते काम धर्मवीर बलिदान मास पाळल्यामुळे घडणार असल्याचे टाकवे येथील युवकांनी सागितले
हा संपुर्ण महिना शोकाचा, दु:खाचा, सुतकाचा मानुन हिंदु समाजबांधवांनी एक महिना दु:खाचा म्हणुन पाळला जातो.
मुंडण करणे, चहा/गोड पदार्थ, आवडते पदार्थ, मिष्ठांन्न खाणे, पानतंबाखु/व्यसन न करणे, पायातील पादत्राणे, दुरदर्शन न पाहणे, दिवसाकाठी एकदाच जेवणे अशा किंवा यातील कोणतीही एक गोष्ट पाळुन महिनाभर श्रद्धांजली वाहिली जाते.
यावर्षीही अनेक गावांमधून हजारो शिवभक्त, धारकर्यांनी धर्मवीर बलिदान मास पाळुन संभाजी महाराजांना एक महिना श्रद्धांजली वाहण्यास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच 3 मार्च रोजी प्रारंभ केला.
दररोज सायंकाळी संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रेरणामंत्र, संभाजीसुर्यह्रदय श्लोक, ध्येयमंत्र म्हणुन श्रद्धांजली वाहिली जाते.
शेवटच्या दिवशी म्हणजे फाल्गुन (म्रुत्यंजय) अमावस्येला मुकपदयात्रेच आयोजन केलं जातं. संपुर्ण हिंदु समाजाने जात-पात, पक्ष-प्रांत, गट-तट-मंडळ, सर्व भेद विसरुन हा बलिदान मास पाळावा व मुकपदयात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन टाकवे येथील युवकांनी (शंभूभक्तानी ) केले आहे.

error: Content is protected !!