वडगांव मावळ:
येथील केशवनगरच्या श्री.हाईट्स या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या शिंदे कुटुंबीयांच्या फ्लॅटला पहाटे पाचच्या दरम्यान विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची महिती मिळताच नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्याकडून अर्थिक मदत घरपोच जाऊन देण्यात आली.
तसेच साधारण एक महिना पुरेल एवढा किराणामाल व ब्लँकेट्स आदी साहित्य सकाळी घरपोहच देण्यात येईल असे आश्वासन दिले. शहरातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबांना सढळ हाताने मदत करावी असे आवाहन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले.

error: Content is protected !!