मंचर:
खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त पूर्वा वळसे पाटील यांच्या पुढाकारातून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
वृंदावन लॉन्स, कारेगाव, ता. शिरूर येथे हे पूर्व तपासणी शिबिर झाले . या शिबिरात राष्ट्रीय वयोश्री योजना आणि दिव्यांग (ADIP) योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती व दिव्यांग बंधू-भगिनींसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांच्या मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी, मोजमाप व नाव नोंदणी करण्यात आली.
दोन दिवसांचे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या संस्थांची या शिबिरासाठी मदत झाली.
शिबीरस्थळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांची सोय करण्यात आली आहे. शिबीरस्थळी सर्व स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने उत्साहाने काम करत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या वृद्धांची योग्य खबरदारी घेऊन त्यांना मदत करत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून वयोवृद्धांचे जगणे सुसह्य होईल, याचे समाधान वाटते.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंग भैया पाचुंदकर पाटील, प्रदीप वळसे पाटील, प्रकाश बापू पवार, विश्वासराव कोहकडे, प्रांत संतोषकुमार देशमुख, डॉ. शुभम पवार, डॉ.दामोदर मोरे, राजेंद्र नरवडे, रंगनाथ थोरात, राजेंद्र गावडे, केशरताई पवार साविताताई बगाटे, स्वातीताई पाचुंदकर पाटील, सुषमाताई शिंदे, अंकिता शिंदे, साविताताई पऱ्हाड, सरपंच निर्मलाताई नवले, ज्योतीताई पाचुंदकर पाटील, वनिताताई कोहकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!